चाळीशी उलटली तरी बिनलग्नाच्या आहेत या सुंदर अभिनेत्री !

487

चित्रपटांमध्ये काम करणारे अनेक अभिनेते अभिनेत्री हे अनेकदा कामांमध्ये अनेकदा व्यस्त असल्यामुळे लग्न फार उशिरा करतात, असं आपल्याला बहुतेकदा दिसून येतं. पंचवीस ते तीस दोन प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने ३७ व्या वर्षी आणि दीपिका पदुकोन हिने ३४ व्या वर्षी लग्न केले आहे. परंतु अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांची चाळीशी पार झाली तरी त्यांनी लग्न केले नाही आहे आणि त्या अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तमोत्तम भूमिका बजावत आहेत. तर पाहूया कोण आहेत या अभिनेत्री.
१. तब्बू – हिंदी चित्रपट सृष्टीतील तब्बूचे वय ४८ पेक्षा ही जास्त आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. १९८० सालापासून आजपर्यंत तिने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक धमाकेदार चित्रपट दिले आहेत. तेलगु, तामीळ, मल्याळम, इंग्रजी, हिंदी, मराठी आणि बंगाली या भाषांमधील चित्रपटातही तिने काम केले आहे. २०११ साली तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. अजय देवगन व काही अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले गेले होते, परंतु कोणीही प्रत्यक्षात या विषयावर भाष्य केले नाही.
२. रिमी सेन – हंगामा, बागवान आणि धूम या हिट चित्रपटांमध्ये रिमी सेनने काम केले आहे. रिमी सेन जवळजवळ ४० वर्षांची आहे. परंतु तिने अद्याप लग्न केलेले नाही. रिमी सेन हिचे खरे नाव शुभोमित्रा सेन आहे, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी त्यांनी स्वतःचे नाव बदलले. फिर हेराफेरी आणि हंगामा हे तिचे दोन गाजलेले चित्रपट आहेत.
३. सुष्मिता सेन – बॉलीवूडमधील प्रसिद्ध नाव म्हणजे सुष्मिता सेन सुष्मिता सेन आता ४४ वर्षांची आहे, अद्याप तिने कोणाशी ही लग्न केले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी तिने “मिस युनिव्हर्स” हा मान पटकावला. तसेच १९९४ साली तिने “फेमिना मिस इंडिया” हा मान सुद्धा पटकावला आहे. हिंदी तसेच तमीळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील सुष्मिता सेनने काम केले आहे. सुष्मिता सेन हिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

४. तृषा कृष्णन – तृषा कृष्णन ही टॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये काम करताना आपण पाहू शकतो. तृषा कृष्णन तिचा अभिनय आणि तिचा बिनधास्तपणा यामुळे ती सर्वांच्या अधिक परिचयाची झाली आहे. तिचे वय देखील ४० आहे, पण तिने ही अजून लग्न केले नाही. तेलगु आणि तमिळ यामधील अनेक हिट चित्रपटांमध्ये तृषा कृष्णन हिने काम केले आहे. काही जणांसोबत तिचे ही नाव जोडले गेले होते, परंतु तिचे लग्न झाले नाही.

५. अनुष्का शेट्टी – टॉलीवूड चित्रपटांमधील लेडी सुपरस्टार म्हणजे अनुष्का शेट्टी. बाहुबली चित्रपटामध्ये अनुष्का शेट्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुष्का शेट्टी देखील जवळ जवळ ४० वर्षांची आहे, पण तिने ही अद्याप लग्न केलेले नाही. अनुष्का शेट्टीचे नाव बाहुबली मधील मुख्य पात्र साकारलेल्या प्रभास या अभिनेत्याबरोबर जोडले जाते. परंतु याबद्दल त्या दोघांनी काही भाष्य केले नाही आहे.