बॉलिवुड स्टार्स त्यांच्या अभिनयाकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे ते जास्त शिक्षण घेऊ शकत नाही असे म्हटले जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे महाविद्यालयीन आयुष्यात गुणवंत विद्यार्थी होते. चला तर जाणुन घेऊ कोण आहेत असे कलाकार.
1. कृती सेनन – हिरोपंती या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कृती सेननने जेपी इंस्टीट्यूट ऑफ इंफारमेशन टेक्नोलॉजीमधुन इलेक्ट्रानिक एंड कम्यूनिकेशनमध्ये ग्रेजुएशन केले आहे. त्यानंतर तिने अनेक वेगवेगळ्या चित्रपटातुन तिच्या अभिनयाची चुणुक दाखवली.
2. परिणिती चोपडा – अभिनेत्री प्रियंका चोपडाची बहिण या पलिकडे एक अभिनेत्री म्हणुन स्वताची ओळख निर्माण केलेली अभिनेत्री परिणिती चोपडा हिने कान्वेंट ऑफ जीसस एंड मैरी मधुन शिक्षण घेतले. त्यानंतर ती लंडनला गेली. तिथे तिने मैंनचेस्टर बिजनेस स्कूल मधुन बिजनेस, फाइनेंस आणि इकनॉमिक्स मध्ये ऑनर्स चे शिक्षण घेतले.
3. प्रिती झिंटा – प्रितीने तिचे महाविद्यालयीन शिक्षण शिमला येथील प्रसिद्ध सेंट बीड्ज कॉलेज मधुन केले. तिने इंग्रजी विषयात बिए ऑनर्स केले आहे. एवढेच नव्हे तिच्याकडे क्रिमिनल साइकोलॉजीमध्ये मास्टर डिग्रीसुद्धा आहे.
4. अमिताभ बच्चन – बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे शेरवुड कॉलेज, नैनीताल चे विद्यार्थी आहेत. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी दिल्लीच्या विश्वविद्यालयातील किरोरीमल कॉलेजमधुन केले. शिक्षणात सुद्धा ते खुप चांगले होते. हुशार विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे. कदाचित हे गुण त्यांच्या वडिलांकडुनच आले असावेत कारण ते एक प्रसिद्ध कवी होते.
5. जॉन अब्राहम – दमदार अॅक्शन आणि जबरदस्त लुकच्या जोरावर बॉलिवुडमध्ये स्वताची ओळख निर्माण केलेला अभिनेता जॉन अब्राहमने बॉम्बे स्कॉटिक स्कुलमधुन शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने जय हिंद कॉलेजमधुन इकोनॉमिक्स मध्ये ग्रेजुएशन केले. तसेच त्याने एमबिएची डिग्री मिळवली. बॉलिवुडमध्ये येण्यापुर्वी तो एडवरटाइजिंग एजेंसी मध्ये मीडिया प्लानर होता. तसेच कॉलेजमध्ये असताना तो फुटबॉल टिमचा कॅप्टनसुद्धा होता.
6. अमिषा पटेल – अभिनेत्री अमिषाने कैथेड्रल एंड जॉन कैनन स्कूल मधुन सुरुवातीचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर ती टफ्ट्स यूनिवर्सिटी मध्ये इकोनॉमिक्स चे शिक्षण घेण्यासाठी गेली. तिथे तिने गोल्ड मेडलसुद्धा पटाकवले.
7. विद्या बालन – अभिनेत्री विद्या बालन ने मुंबईच्या जेवियर्स कॉलेजमधुन सोशॉलॉजी मध्ये ग्रेजुएशन आणि मुंबई यूनिवर्सिटी त्याच सब्जेक्ट मध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले.
8. सोहा अली खान – सोहाने तिचे सुरुवातीचे शिक्षण नवी दिल्ली येथील द बिर्टिश स्कूल मधुन घेतले. तिने इतिहास या विषयाचे पुढीप शिक्षण ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमधुन घेतले. तर मास्टर्स डिग्री इंटरनेशनल रिलेशंस मध्ये लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्समधुन घेतली.
9. रणदिप हुड्डा – रणदिप हुड्डाच्या वडिलांना त्यांच्या मुलाने डॉक्टर बनावे अशी इच्छा होती. रणदिप हुड्डाचे शालेय शिक्षण आर के पुरम मध्ये दिल्लीच्या पब्लिक स्कुलमधुन झाले होते. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी मेलबर्नला गेला. तिथे जाऊन त्याने बिजनेस मैनेजमेंट आणि ह्यूमन रिर्सोस मैनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री मिळवली. भारतात आल्यावर त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
10. आर माधवन – तनु वेड्स मनु सारखा हिट चित्रपट देणारा अभिनेता आर माधवन याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण केले त्यानंतर तो महाराष्ट्रात बेस्ट एनसीसी कॅडेट म्हणुन निवड झाली. त्यानंतर त्याला सात एनसीसी कॅडिडेट सोबत इंग्लडला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्याला सन्मानास्पद लंडन येथील तीन शाही सेना विंग (जल, थल, वायु )मध्ये ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !