Headlines

चालत्या रेल्वेमध्ये कपडे बदलण्यासाठी टॉयलेट मध्ये गेलेली महिला अचानक झाली गायब, कुठे सापडली ऐकून थक्क व्हाल !

रेल्वेच्या टॉयलेटमधून अचानक गायब झालेल्या महिलेचा अखेरीस शोध लागला आहे. मौर्य एक्सप्रेसमध्ये रांची येथून आपल्या पतीसोबत लखीसराय येथे जाणारी अचानक गायब झालेलय महिलेचा पत्ता लागला आहे. त्या महिलेला कोणीही अपहरण केले नव्हते. ती तिच्या पतीला सोडून गोरखपूर येथे आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. धनबाद रेल्वे पोलिसांनी तिला गोरखपूर येथून ताब्यात घेऊन तिला तिच्या परिवाराकडे सुपूर्द केले. नातेवाईकांनी सीएम हेमंत सोरेन यांच्याकडे विनवणी केल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले.

१२ जुलैच्या रात्री मौर्य एक्सप्रेस धनबाद स्टेशनला पोहोचल्यानंतर ती महिला कपडे बदलण्यासाठी टॉयलेट जात असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ती परतच नाही आली. त्या महिलेच्या पतीने या प्रकरणाची तक्रार धनबाद रेल्वे पोलिसांकडे केली. लखीसराय येथे राहणार तिचा पती अजीत कुमार याने चार-पाच अज्ञात प्रवाश्यांनी पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याने रेल्वे पोलिसांनी सक्रियता वाढवली आणि लगेच महिलेला ताब्यात घेतले.

एका कंपनीमध्ये सेल्समॅन म्हणून काम करणारे अजीत कुमार यांच्यासोबत त्या महिलेने २०१९ मध्ये लग्न केले. लग्नानंतर पतीने तिला घरी नेले नाही. याच दरम्यान फेसबुकवर तिची ओळख एका मुलासोबत झाली आणि दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनतर पहिल्यांदा तिचा पती तिला सासरी घेऊन जात होता. हे त्या महिलेच्या प्रियकराला खटकले.

ती महिला धनबाद स्टेशन आल्यावर स्टेशनवर उतरली आणि बसने वाराणसीला पोहोचली आणि मग तिथून ती गोरखपूर येथे आपल्या प्रियकराकडे गेली. तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती तिच्या घरातल्यांना देखील होती. म्हणूनच सासरी जातं तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून टाकण्यात आले होते परंतु वायफायचा वापर करून तिने व्हाट्सअप वर आपल्या प्रियकराशी संपर्क साधला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारेच या महिलेचा शोध घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !