Headlines

मोठ्या मोठ्या श्रीमंताला लाजवतील एवढ्या प्रॉपर्टीचे मालक आहेत अभिनेते परेश रावल, संपत्ती वाचून हैराण व्हाल !

बॉलिवुड मध्ये गेल्या कित्येक दशकात वेगवेगळ्या अभिनेत्यांची फळी येऊन गेली आहे मात्र काही मोजकेच असे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता परेश रावल. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. विनोदी भुमिका या परेश रावल यांचा हातखंड आहे. परेश रावल यांनी प्रेक्षकांकडुन प्रेम तर मिळवलेच पण त्याच सोबत बक्कळ पैसा सुद्धा कमावला. आज आम्ही तुम्हाला परेश रावल यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

परेश रावल यांचा जन्म ३० मे १९५५ ला मुंबईत झाला होता. परेश यांनी वरळीच्या र्ले नर्सी मूंजी कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स मधुन त्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण पुर्ण केले. मात्र इंजिनियरिंग करुनही ते खुप वेळ बेरोजगारच होते. खुप काळ त्यांनी स्वतासाठी नोकरी शोधली. पण काही केल्या त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही. त्यांना एक चांगले व सफल असे इंजिनीयर व्हायचे होते मात्र त्यांची ही इच्छा स्वप्नापुरतीच बंधित राहिली. परेश यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

इंडस्ट्रीमध्ये नाव कमावल्यावर त्यांनी २०१४ मध्ये राजकरणात प्रवेश केला. त्यावेळी त्य़ांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. त्यात त्यांना विजय देखील मिळाला. निवडणुकीच्या वेळी उमेदवाराला त्यांच्या संपत्तीची माहिती द्यावी लागते. त्यावेळी परेश यांनी त्यांच्याकडे ८० करोड रुपयांची संपत्ती असल्याचे दाखवले होते. एवढेच नव्हे त्यांची पत्नीसुद्धा ८ करोड रुपयांची मालकिण आहे. तर ते स्वता ७० करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे. तसेच इतर मालमत्ता त्याच्या दोन मुलांच्या नावावर आहे.

परेश रावल यांची पत्नी दिसायला खुपच सुंदर असुन एके काळी तिने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. तसेच ती अभिनयाशी संबंधित कंपनी प्लेटाइमची मालक आहे. परंतु तरीही ती तिचा सर्वाधिक वेळ तिच्या परिवारासोबत घालवणे पसंत करते. परेश रावल यांना आदित्य आणि अनिरुद्ध अशी दोन मुले आहे.

परेश रावल यांनी हिंदी सोबतच इतर भाषांमध्ये पण काम केले आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमधुन त्यांनी त्यांच्या शानदार अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. त्याच मुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यामध्ये नेशनल अवार्ड, फिल्म फेयर आणि पदम् श्री पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेत्यासोबतच ते गुजरातच्या अहमदाबाद येथील संसदेचे उमेदवारसुद्धा राहिले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !