Headlines

फक्त या कारणामुळे राणी मुखर्जी ऐवजी ऐश्वर्या झाली अभिषेकची बायको, जाणून घ्या !

बॉलिवुडच्या संस्कारी सूनांच्या यादीत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे नाव सहभागी आहे. सौंदर्य आणि टॅलेंटच्या जोरावर ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब स्वताच्या नावावर केला होता. ऐश्वर्या ही एक उत्कृष्ट आई, सुन आणि पत्नी आहे. ती नेहमीच तिच्या परिवाराला आणि फिल्म इंडस्ट्रीला सांभळत असते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाला १४ वर्षे पुर्ण झाली. या १४ वर्षात ते दोघेही एकमेकांच्या सोबत सावलीसारखे होते. त्याच्याकडे पाहिल्यावर ते एकमेकांसाठीच बनले आहेत असा सतत भास होतो. एवढे असुनही ऐश्वर्या ही अभिषेकचे पहिले प्रेम नव्हती. तिच्या आधी अभिषेकच्या आयुष्यात करिष्मा कपुर आणि राणी मुखर्जी या दोन्ही अभिनेत्री होत्या. करीश्मासोबत तर त्याचा साखरपुडासुद्धा झाला होता मात्र तो काही कारणास्तव तुटला ज्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

राणी सोबतचे अभिषेकचे नाते तुटण्या मागचे मुख्य कारण अभिषेकच्या घरातच असल्याचे म्हटले जाते. राणी आणि अभिषेकच्या नात्यात मीठाचा खडा जया बच्चन यांच्यामुळे पडला. जयाचा कडक आणि खोचट स्वभाव जगापासुन लपलेला नाही. कित्येकदा त्यांचा राग मिडीयाच्या कॅमेऱ्यातसुद्धा कैद झाला आहे.

करीश्मासोबत साखरपुडा मोडल्यानंतर राणीने अभिषेकच्या आयुष्यात खास जागा निर्माण केली होती. अमिताभ बच्चनने सुद्धा त्यांच्या नात्याला परवानगी दिली होती. पण जया बच्चन यांनी या नात्याला नामंजुरी दर्शवली. लागा चुनरी मे दाग या चित्रपटाच्या चित्रकरणापासुनच त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागल्याच्या चर्चा होत्या.

या फिल्मच्या प्रदर्शनानंतर राणीच्या घरचे अभिषेकच्या घरी गेले होते. मात्र त्यावेळी जया बच्चन यांनी त्यांचा पाणउतारा केला. त्याचे असे वागणे राणीच्या कुटुंबियांना आवडले नाही. त्यानंतर राणी आणि अभिषेकचे नाते कायमचे तुटले.
राणी नंतर ऐश्वर्याने अभिषेकच्या आयुष्यात एंट्री घेतली. तिने अभिषेक, अमिताभ आणि जया यांच्या मनात खास जागा बनवुन घेतली व नंतर त्या कुटुंबाची सुन होण्याचा मान पटकवला. ऐश्वर्याला जरी इंडस्ट्रीमधली संस्कारी सुन म्हटले जात असले तरी जया बच्चनला मात्र खाष्ट सासु म्हटले जाते. पण तरीही त्यांची खुप छान केमेस्ट्री असल्याचे दिसुन येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !