Headlines

२०२२ मध्ये हे जबरदस्त चित्रपट होणार प्रदर्शित, IMDBने जाहीर केली यादी, जाणून घ्या !

जगभरात अचानक उद्भवलेल्या या कोरोना संकटाचा सर्वच स्तरांवर परिणाम झाला. प्रत्येक क्षेत्र या दरम्यान आपला जम धरू पाहत होते. मनोरंजन आणि प्रेक्षकांची यांची देखील थोड्या अधिक प्रमाणात ताटातूट झाली असं आपल्याला म्हणता येईल. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि ऑनलाईन अँप्सच्या माध्यमातून आपण आपले मनोरंजन करत होतो. पण प्रत्यक्षात मात्र बाहेर पडून चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, ही मजाच काही वेगळी असते.

२०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह फार कमी दिवसांसाठी उघडण्यात आले होते. वर्षअखेरीस चित्रपटगृहे सुरू झाल्याने सिनेप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला. पुढच्या वर्षापर्यंत सर्व काही ठीक होईल आणि प्रेक्षक पूर्वीप्रमाणे कोणत्याही भीतीशिवाय चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटांचा मनसोक्त आनंद लुटतील, अशी अशा आहे. येत्या वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

IMDb ने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी तयार केली आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या वर्षात कोणते मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, पाहुयात.

१. KGF chapter 2 – साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता यश याचा KGF Chapter-2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला चित्रपट २०१८ मध्ये आला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. तेव्हापासून लोक या चित्रपटाच्या पुढील सिक्वेलची वाट पाहत आहेत. यावेळी या चित्रपटामध्ये सहकलाकार म्हणून संजय दत्त आणि रवीना टंडन देखील दिसणार आहेत.

२. RRR – ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यात आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगनसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाटु नाटु हे गाणं हल्लीच रिलीज झालं. प्रेक्षकांनी तर या गाण्याला जणू डोक्यावरच घेतलं आहे. या गाण्यातील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा डान्स तर जणू पर्वणीच आहे. हे गाणे व त्यातील स्टेप्स यावर इंस्टाग्राम रिल्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग आहेत.

३. लालसिंग चड्ढा – पुढील चित्रपट आहे, आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा. हा चित्रपट हॉलीवूड स्टार टॉम हँक्सचा चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक असेल. यामध्ये करीना कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसमध्ये रिलीज होणार होता परंतु हा चित्रपट आता १४ एप्रिल २०२२ मध्ये रिलीज होणार आहे.

४. गंगुबाई काठियावाडी – चित्रपटात आलीय भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव गंगूबाई काठियावाडी आहे. एका महिला डॉनची ही कथा आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर व टिझर रिलीज झाल्यानंतर सर्वांनीच आलियाच्या अभिनयाचे कौतुक करत हा चित्रपट उत्सुकता दर्शवली होती.

५. Beast – तमिळ सुपरस्टार विजयच्या बीस्ट या चित्रपटाचीही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीप कुमार यांनी या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

६. धाकड – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे. यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन रजनीश राझी घई यांनी केले आहे.

७. राधे श्याम – या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही एक प्रेमकथा असून याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.

८. ब्रह्मास्त्र – अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत आहेत. यात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

९. हिरोपंती २ – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा पहिला सिनेमा ‘हिरोपंती’. या चित्रपटाचा पुढील सिक्वेल ही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. यात त्याच्या सोबत तारा सुतारिया देखील दिसणार आहे.

१०. आदिपुरुष – रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉनसारखे कलाकार आहेत. ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून T-Series या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी व तेलगू सहित मल्याळम, तामिळ आणि कन्नड या भाषणामध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देखील येत्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !