Headlines

‘मन उडू उडू झालं’ मधील अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच करणार प्रतीक शाहसोबत लग्न ? जाणून घ्या !

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अशा अभिनयाने अभिनेत्री हृता दुर्गुळे दुर्गुळे हिने सर्व प्रेक्षकांचे मन जाणले आहे. स्टार प्रवाह वरील दुर्वा या मालिकेमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०१७ मध्ये झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेमध्ये “वैदेही” या भूमिकेने तिला अधिक प्रकाशझोतात आणले. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या कार्यक्रमामध्ये मुख्य भूमिका बजावत आहे.

हृता नेहमीच आपल्या चाहत्यांच्या पोस्ट शेयर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते. इतके जरी असले तरी हृताने कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर कधीही वाच्यता केली नाही. परंतु हल्लीच तिने सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशिप सांगितले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळेने अलीकडेच टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत तिचे नाते अधिकृत केले आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. जेव्हापासून हृताने तिच्या रिलेशनशिपची घोषणा केली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांसोबत प्रतिक आणि तिचे रोमँटिक फोटो शेयर करताना दिसत आहे. अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर आणखी एक घोषणा केली आहे ज्यातून असे कळते आहे की ती प्रतीकशी लग्न करणार आहे. प्रतिक आणि हृता २५ डिसेंबरला साखरपुडा करणार असल्याची चर्चा सध्या तिच्या एका पोस्टमधून मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)


हृताने प्रतीकसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे,
“मी इतकी भाग्यवान कशी ठरले?
@prateekshah1 तुझ्या या असण्याबद्दल धन्यवाद
कधीही न संपणारे हास्य, नॉनस्टॉप बडबड, अवास्तव आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम हे आज आणि कायमचे आहे #8daystogo #happiness #grateful #positivevibesonly #blessedandhow”
हे कॅप्शन वाचून हृताचे चाहते तपशील जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ती काहीही स्पष्टपणे बोलताना दिसत नाही आहे.

प्रतीक शाह बद्दल जाणून घ्यायचे झाले तर, प्रतीक शाह हा चित्रपट आणि टीव्ही दिग्दर्शक आहे. तेरी मेरी इक्क जिंदरी, बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, मनमोहिनी आणि इतर हिंदी टीव्ही शोचा तो भाग आहे. प्रतीक हा मराठी अभिनेत्री मुग्धा शाहचा मुलगा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !