Headlines

टीव्हीवरील या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये सुद्धा खूप कमावले नाव, त्यांच्या बालपणीचे फोटो पाहून नक्की पहा !

लॉक डाऊन च्या या काळात सध्या सोशल मीडियावर तो थ्रोबॅक फोटोंचा फ्रेंड चालू आहे. सध्या सगळेजण घरातच असल्याकारणाने फोटो शूट करायला मिळत नाही. त्यामुळे सध्या जुन्या फोटोंवर सगळे काम चालून घेताना दिसत आहेत. बॉलीवूड कलाकार सुद्धा या दिवसात त्यांचे जुने फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. आता नुकतेच टीव्हीवरील एका मोठ्या अभिनेत्रीने तिचे बालपणीचे फोटो पोस्ट केले आहेत. या अभिनेत्रीला तिच्या लहानपणीचे फोटो पाहून ओळखले थोडे मुश्कीलच आहे. चला तर मग जाणून घेऊ कोण आहे ही अभिनेत्री.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रामायण मालिकेतील सीतेची भूमिका निभावणारी दीपिका चिखलिया. नुकतेच दिपीकाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दीपिका साडी नेसलेल्या दिसतात. त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, हा फोटो हे दाखवून देतो की साडीवरील माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. साडीला अनेक वेगवेगळ्या प्रकारे घेतले जाऊ शकते. साडी ही प्रत्येक भारतीय महिलांच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये असतेच ‌ तुमची फिगर कशीही असो साडी तुमच्यावर नेहमीच खुलून दिसते.
९० च्या दशकात दीपिका एवढ्या प्रसिद्ध झाल्या होत्या की त्या जेथे कुठे जायच्या तेथे लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या मागे यायचे. तिने साकारलेल्या सीतेच्या भूमिकेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तिच्या कपड्यांवर जाणीवपूर्वक लक्ष द्यायच्या. दीपिका यांना अधिक तर साडी मध्येच पाहिले गेले आहे.
दीपिका यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या सून मेरी लैला या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी रामानंद सागर यांची दादा दादी की कहानी या मालिकेत काम केले. दीपिका यांनी अनेक बॉलीवूड च्या छोट्या बजेटमधील चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. सर्वात शेवटी त्यांना आयुष्मान खुराना च्या बाला या चित्रपटात पाहिले गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *