बॉलिवूडमध्ये अनेक लोक स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी येतात परंतु प्रत्येक जाण्यात यशस्वी होतेच असे नाही. बॉलीवूड हा फक्त खेळ नाही तर येथे नशीब सुद्धा साथ देणे आवश्यक असते. नशिबाने साथ दिली नाही तर आपले काहीच होऊ शकत नाही. आजच्या या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड शाळा त्या सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिला तिच्या पहिल्याच चित्रपटात डान्स करण्यासाठी केवळ १० रुपये मिळाले होते.
आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध असणारी जया प्रदा. ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा ती केवळ १२ वर्षांची होती. त्यावेळी साउथ कडील प्रसिद्ध डिरेक्टर बी तीलक यांनी तिला शाळेमध्ये डान्स परफॉर्मन्स करताना पाहिले होते. त्याच वेळी त्यांनी निर्णय घेतला की ते जयाला त्यांच्या चित्रपटांमध्ये कास्ट करतील. सुरुवातीला या गोष्टीसाठी जया नाराज होत्या परंतु पालकांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्या तयार झाल्या. त्यानंतर काही दिवसातच बी तीलक यांनी जयाला त्यांच्या चित्रपटामध्ये डान्स करण्याची संधी दिली.
त्यावेळी भूमी कोसम या चित्रपटात तीस मिनिटे डान्स करण्या बदल्यात तिला केवळ दहा रुपये मिळाले होते. मात्र त्या डान्स नंतर जयाचे नशिबच पालटले. यानंतर जया यांना अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि बघता बघता त्या चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा बनलेल्या. जया यांनी साउथ चित्रपटांव्यतिरिक्त बॉलीवूड मध्ये सुद्धा स्वतःची जादू दाखवली आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले.
या दरम्यान त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आणि एक सफल अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. जयाप्रदा यांना तीन फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी १९९४ला तेलगू देसम पार्टी या पक्षात द्वारे राजकारणात प्रवेश केला आणि काही काळ संसदीय खासदार म्हणून कामकाज पाहिले.
त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील राजामंड्री येथे झाला. त्यांचे शिक्षण तेलगू माध्यमातून झाले असून लहानपणीच त्यांनी नृत्य व संगीताचे शिक्षण घेतले होते. भारतीय चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी जयाप्रदा यांना भारतीय चित्रपट पडद्यावरील सर्वात सुंदर चेहरा म्हणून संबोधले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
एकेकाळी तीस मिनिटांच्या डान्स करिता मिळाले होते फक्त दहा रुपये, त्यानंतर नशीब पालटल्यामुळे ही अभिनेत्री झाली सुपरस्टार !
