Headlines

मी बिकिनी घेताना वडीलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे … या अभिनेत्रीने केला खुलासा !

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अनेकदा तिच्या बिकनी लूक मुळे ट्रोल झाली आहे. ती हिंदी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रकुलला याआधी बिकनी वरून अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते मात्र तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी तिच्या परिवाराचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे.
एका मुलाखतीत तिने या गोष्टीचा खुलासा केला की तिचे करिअर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत तिच्या आईवडिलांनी तिच्या बोल्ड आणि बिकनी लूक ला पाठिंबा दर्शवला आहे. याआधी अनेकदा मी बिकनी कशी घालू हा प्रश्न तिला सतावायचा. मात्र तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच पुढे जाण्याचा सल्ला दिला. रकुल ने स्वतः या गोष्टीचा जाहीर खुलासा केला की तिच्या आई-वडिलांसोबत बिकने लुक वरून चर्चा करते. चला तर जाणून घ्या रकुल प्रीत सिंह आणि काय सांगितले.
रकुल प्रीत सिंहने २०११ मध्ये पीजेंट मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत रकुल पाचव्या स्थानावर होती. या स्पर्धेवेळी तिला बिकनी घालावी लागेल या गोष्टीची तिला भीती होती. त्यासाठी ती अजिबात तयार मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला प्रेरित केले. एका मुलाखतीत रकुलने सांगितले की तिने तिच्या आईला सांगितले होते मिस इंडिया या स्पर्धेसाठी बिकनी घालावी लागते आणि मी यासाठी तयार नाही. त्यावेळी तिच्या आईने तिला सांगितले की यात कोणतीही एवढी मोठी गोष्ट नाही. तू स्वतःला या गोष्टीसाठी तयार कर.
रकुल सांगते की मुलांना त्यांच्या आई-वडिलांचा पाठिंबा अनेकदा मिळत नाही. मात्र माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांना माझ्या बिकनी घालण्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. रकुल ने तिच्या वडिलांबद्दल सांगताना सांगितले की जेव्हा ती बिकानीच्या शॉपिंग साठी जायची तेव्हा तिचे वडील तिला स्वतः सांगायचे की बिकनी गडद रंगाची घे. हलक्या रंगाची नको. रकुलने सांगितले की सुरूवातीपासून च तिचे आई वडील ओपन माईंडेड आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली ठरली आहे.
फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार अभिनेत्री रकुल प्रीत ने एका मुलाखतीत हिंट दिली आहे की दे दे प्यार दे या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येऊ शकतो. रकुल ने सांगितले की चित्रपटाच्या सिक्वेलची विचार करूनच क्लायमॅक्स लिखाण केले गेले होते. शिवाय मी सुद्धा निर्मात्यांच्या सतत संपर्कात आहे. याव्यतिरिक्त रकुल लवकरच जॉन अब्राहम आणि जॅकलीन सोबत अटॅक या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. हा एक ॲक्शन पट आहे. तसेच ती अर्जुन कपूर सोबत सुद्धा एक चित्रपट करत आहे मात्र या चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *