टकलेपणा हा फक्त पुरुषांमध्येच का येतो, स्त्रियामध्ये कधीच येत नाही, जाणून घ्या त्यापाठीमागचे कारण !

bollyreport
3 Min Read

संपूर्ण जगभरात संपूर्ण सजीव जातीमध्ये फक्त मनुष्य ही एकच जात अशी आहे जी टकलेपणाची शिकार होते. मनुष्य जातीमध्ये पण हे फक्त पुरुषांमध्येच अधिक होताना दिसते. तसेच मनुष्य हा एकमेव सजीव असा आहे जो लग्न करतो. केस गळण्या मागे तणाव हे एक मोठे कारण असू शकते. जर टकले पणाचे मजेशीर विश्लेषण करायचे झाल्यास यामागील एकुलते एक कारण हे पत्नीच असते असे समजले जाते. या गोष्टीला जास्त गंभीरतेने घेण्याची गरज नाही कारण हे एक जीव विज्ञान आहे.
पोषणाची कमतरता किंवा ताणतणावामुळे महिलांच्या डोक्यावरील केस गळणे ही समस्या निर्माण होते. जसजसे महिलांचे वय वाढत जाते तसे ही समस्या त्यांच्यामध्ये दिसून येते. काही वेळेस केस गळण्याऐवजी ते पातळ होतात. परंतु स्त्रियांमध्ये पूर्णपणे टकले होण्याची क्षमता ही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी असते. पण पुरुषांच्या बाबतीत ही समस्या एकदम उलटी असते. एका विशिष्ट वयानंतर पुरुषांचे केस कमी होण्यास सुरुवात होतात आणि पन्नाशी ओलांडल्यावर डोक्यावर टक्कल दिसू लागते.
शरीरावर केस येणे हे हार्मोनल बदलांमुळे घडून येते तसेच शरीरावरील केस जाणे हे देखील हार्मोन्सच्या बदलामुळे होते. नॉर्वे येथील बर्गेन युनिव्हर्सिटीमधील जीवविज्ञानिक पेर जैकबसन यासाठी टेस्टोस्टेरोन हा हार्मोन टकलेपणा साठी कारणीभूत असल्याचे सांगतात. हा हार्मोन पुरूषांमधील एंड्रोजन समूहातील स्टेरॉईड हार्मोन आहे. पुरुषां मधील केस गळतीची समस्या याच हार्मोन्समुळे होते. मनुष्याच्या शरीरात काही एंनजाइम असे असतात जे टेस्टोस्टेरोन ला डिहाइड्रोटेस्टोस्टेरॉन मध्ये बदली करतात. डिहाइड्रोटेस्टोस्टेरॉन केसांना पातळ आणि कमजोर करतात. याचे अंश मनुष्य जातीमध्ये असल्यामुळे ते अनुवंशिक ठरते.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण खूप कमी असते तसेच महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन सोबतच एस्ट्रोजन हे हार्मोन्स सुद्धा असते त्यामुळे महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन ला डिहाइड्रोटेस्टोस्टेरॉन मध्ये बदली करण्याची प्रक्रिया खूप कमी होत असते. कधीकधी गर्भावस्थेत ही प्रक्रिया जलद होते. त्याकाळात महिलांचे केस गळण्या सुरुवात होतात मात्र हार्मोनल असंतुलनाची ती घटना काही काळापुरतीच मर्यादित असते. मुख्यतः डिहाइड्रोटेस्टोस्टेरॉन चे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे महिलांचे केस गळू लागतात.

हे वाचा – अखेर समजले, प्रियांकाने या कारणामुळे केले १० वर्ष छोट्या निक सोबत लग्न !

साधारणतः पुरुषांचे केस तिशी ओलांडलेल्या वर गळण्यास सुरू होतात आणि पन्नाशी येईपर्यंत साधारण टक्कल पडलेले असते. ही प्रक्रिया अचानक होत नाही. टेस्टोस्टेरॉनचे डिहाइड्रोटेस्टोस्टेरॉन मध्ये हे बदलणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. जोपर्यंत तुम्ही प्रोढ होत नाही तोपर्यंत तुमच्यावर या गोष्टीचा फरक पडलेला दिसत नाही. नैसर्गिक रित्या केस गळण्या ला विज्ञानी भाषेत एंड्रोजनिक एलोपीसीया असे म्हणतात.

हे वाचा – जाणून घ्या शक्ती कपूर यांच्या बद्दल अशा १० गोष्टी ज्या तुम्हाला आजतागायत माहीत नसतील !

काही दुर्भागी लोक खूप कमी वयातच टक्कल पडण्याच्या समस्येला तोंड देत असतात. हे त्यांची त्वचा थोडी वेगळी असल्याकारणाने होते. काही लोकांची डोक्यावरील त्वचा ही या एंजाइम्सच्या संग्रहाचे काम करते ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर टक्कल लवकर पडते.

हे वाचा – किसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते विसरायचा प्रयत्न ! 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *