Headlines

स्वतःच्याच विद्यार्थिनी बरोबर केले या प्रसिद्ध अभिनेत्याने लग्न, फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

बॉलिवूड अभिनेता आर माधवनने नुकतेच पन्नाशीत पदार्पण केले. माधवचा जन्म १ जून १९७० मध्ये जमशेदपूर मध्ये झाला होता. आर माधवन चे पूर्ण नाव रंगनाथ माधवन असे आहे. माधवनने रहना है तेरे दिल में, थ्री इडीयट्स, तनु वेड्स मनू , तनु वेड्स मनु रिटर्न यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे याशिवाय तो एक लेखक, दिग्दर्शक व सूत्रसंचालक सुद्धा आहे.
माधवनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने सरिता बिर्जे सोबत लग्न केले. माधवन आणि सरिता ची पहिली भेट कोल्हापूर मध्ये झाली होती. त्यावेळी सरिता तेथे तिचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास अटेंड करण्यासाठी आली होती. या क्लासचा प्रमुख माधवन होता.

त्यानंतर जेव्हा सरिताला एअरहोस्टेस चा जॉब मिळाला तेव्हा तिने माधवनचे आभार मानण्यासाठी त्याला डिनर साठी इनवाईट केले. येथूनच पुढे दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. या दोघांनी एकमेकांना तब्बल आठ वर्षे डेट केले आणि त्यानंतर १९९९ ला विवाह बंधनाची गाठ बांधली. आता माधवन आणि सरिताला वेदांत नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

चित्रपट सृष्टीत स्वतःच्या मेहनतीवर वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या माधवनला सुरुवातीला आर्मी मध्ये करिअर करण्याची इच्छा होती. मात्र जर तो आर्मी ऑफिसर झाला असता तर जग एका क्युट हिरोला मुकले असते. माधवन चे वडील टाटा स्टील मध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते आणि आई सरोज बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर म्हणून काम करायची.

माधवनला एक बहीण सुद्धा आहे. तिचे नाव देविका रंगनाथन असे आहे. देविका सध्या युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करते. सुरुवातीपासूनच माधवन शिक्षणामध्ये अव्वल होता.

त्याला १९८८ मध्ये त्याच्या शाळेला कल्चरल ॲम्बेसिडर म्हणून कॅनडामध्ये रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली होती. याव्यतिरिक्त माधवन एनसीसी मध्ये एक उत्कृष्ट कॅडीडेट सुद्धा होता. त्यानंतर १९९६ मध्ये माधवनने एका मॉडेलिंग एजन्सीमध्ये स्वतःचा पोर्टफोलिओ सबमिट केला होता.

निरागस चेहरा आणि आकर्षक पर्सनालिटी या दोन्ही गोष्टींमुळे त्याला जाहिरातींच्या ऑफर मिळू लागल्या. १९९६ मध्ये माधवनने सॅंडलवूड टॉक च्या जाहिराती मध्ये काम केले होते. त्यानंतर या जाहिरातीचे दिग्दर्शक संतोष सिवान यांनी माधवन यांची शिफारस मणिरत्नम यांच्या कडे करून त्यांना त्यांच्या पुढील प्रोजेक्ट इरुवरमध्ये कास्ट करण्यास सांगितले.

हा माधव यांच्या आयुष्यातील पहिला चित्रपट होता जो सुपरहिट सुद्धा ठरला. माधवनला चित्रपट मिळवण्यासाठी जास्त स्ट्रगल करावे लागले नाही. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट होत गेले आणि बघता बघता तो एक सुपरस्टार बनला.

१९९८ मध्ये माधवने इन्फर्नो या इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. या चित्रपटात त्याने एका भारतीय पोलिस ऑफिसर ची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘रहना है तेरे दिल में’ या हिंदी चित्रपटामुळे त्याला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली. २०१० साली प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी यांचा ‘थ्री इडीयट्स’ हा चित्रपट माधवनने केलेल्या चित्रपटांपैकी एक बेस्ट चित्रपट होता.

त्यानंतर २०११ मध्ये तो तनु वेड्स म्हणून या चित्रपटामध्ये दिसला. या चित्रपटात त्याच्या सोबत नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्री कंगना रनौत ने काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धमाल उडवून दिली. ज्या प्रकारे हा चित्रपट हिट झाला त्याच प्रकारे या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा लोकांना खूप आवडला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांची कमाई केली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *