Headlines

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी टूथब्रश सारखे बदलले आपले बॉयफ्रेंड, नंबर ४ ने तर बदलले तब्बल ९ बॉयफ्रेंड !

बॉलिवूडच्या या ग्लॅमरस दिसणाऱ्या दुनियेत अनेक विविध गोष्टी घडत असतात. जसे रुपेरी पडद्यावर चित्रपटांमध्ये गोष्टी घडतात, तशाच या अभिनेत्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात ही काही गोष्टी घडतात. प्रेमात पडणं, ब्रेकअप होणं, भांडणं होणं ह्या गोष्टी कलाकारांच्या आयुष्यात ही घडत असतात.

एखाद्या अभिनेता व अभिनेत्रीच्या अफेयरबद्दल चर्चा होणं ही काही नवीन गोष्ट नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या अफेयरच्या चर्चा होत असतात. सोबतच या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उचलून देखील धरल्या जातात. बॉलिवूडमध्ये स्वतःची अढळ जागा निर्माण करणाऱ्या काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेऊयात !

१. कंगना रनौत – बॉलिवूडमधील सदैव चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत. आघाडीची अभिनेत्री असलेली कंगना ही तिच्या वक्त्यांवरून नेहमी चर्चेत असते. कंगनाचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. कंगनाचे आतापर्यत ५ अफेयर्स झाले आहेत. अभिनेत्री होण्याची तयारी नसल्यामुळे चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळात तिला अडचणी आल्या. सुरुवातीला इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व नसल्याने, इंग्रजी नीट येण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिच्या या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात आदित्य पांचोली आणि त्यांची पत्नी जरीना वहाब यांनी तिला मदत केली.

काही काळानंतर आदित्य पांचोली आणि कंगन रनौत यांच्या नात्याविषयी बाहेर चर्चा होऊ लागली. नंतर २००७ मध्ये तिने दारूच्या न*शे*त तिच्यावर शारीरिक अ*त्या*चा*र केल्याची आदित्य पांचोलींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या प्रकरणांनंतर अध्ययन सुमन, इंग्लिश डॉक्टर निकोलस लेफर्टी, अजय देवगण व ह्रितिक रोशन अशा दिगज्ज व्यक्तींसोबत तिचे नाव जोडले गेले.

२. प्रियांका चोप्रा – फक्त बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूड मधील ही चित्रपटात काम करत तिने आपल्या भिनयचा ठसा उमटवला आहे. प्रियांकाचे जवळ जवळ ७ अफेअर्स चर्चेत आले. २००० साली मिस वर्ल्ड बनत तिने द हिरो-लव्ह स्टोरी ऑफ स्पाय या चित्रपटात काम केलं. त्यानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले व अनेक मोठ्या दिगज्जांसोबत तिने काम केले आहे.

इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रियांकाचे देखील नाव असीम मर्चेंट, हरमन बवेजा, शाहिद कपूर, अक्षय कुमार, टॉम हिडिलसकन, शाहरुख खान अशा कलाकार इतर प्रसिद्ध व्यक्तींसोबत जोडले गेले. ऑगस्ट २०१८ मध्ये हॉलिवूडमधील अभिनेता व गायक निक जोनास सोबत जोधपूर येथील उमेद भवन पॅलेस येथे लग्न केले.

३. आलिया भट – फार कमी काळात व कमी वयात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे आलीया भट. आलीयाचे ६ लव्ह अफेअर्स चर्चेत आले. कारण जोहरच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यांनतर २ स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्रीनाथ कि दुल्हनिया, राज, उडता पंजाब, गली बॉय यासारखे हिट चित्रपट दिले. आलियाचे सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, कवीन मित्तल, अली दादरकर व तिचा मित्र रमेश दुबे या व्यक्तींसोबत तिचे अफेयर होते. सध्या तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले आहे.

४. दीपिका पदुकोण – बॉलिवूडमधील आताच्या घडीला सर्वात यशस्वी असलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. दीपिकाचे तब्बल ९ अफेअर्सची चर्चा झाली होती. एकामागून एक १०० करोडचे ४ चित्रपट देणारी अभिनेत्री ती ठरली आहे. ओम शांती ओम या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टिती पदार्पण केलं. मॉडेल, अभिनेत्री होण्याआधी दीपिका राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाडू स्पर्धेपर्यंत पोहचली होती. २००८ मध्ये ‘बचना ए हसींनो’ या चित्रपटातील तिचा सहाय्यक अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली. परंतु काही काळानंतर ते दोघे वेगळे झाले.

रणबीरने तिला धोका दिला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले व नंतर रणबीरने ते मान्य देखील केले. यानंतर उपेन पटेल, सिद्धार्थ माल्या, निहार पंड्या, मु मध्ये तिने मुज्जमिल इब्राहिम, क्रिकेटर एमएस धोनी, युवराज सिंह आणि रवि चौहान अशा लोकांशी तिचे नाव जोडले गेले. २०१८ मध्ये तिने रणवीर सिंह सोबत तिने लग्न केले.

५. अनुष्का शर्मा – अनुष्का शर्मा ही बॉलिवूड मधील एक यशस्वी व सर्वाधिक मानधन मिळवणारी अभिनेत्री आहे. अनुष्काचे ७ लव्ह अफेअर्स चर्चेत आले. अभिनयाव्यतिरिक्त ती संस्थांना मदत करणे व इतर मोहीम चालवणे अशी कामे देखील करते. तिने स्वतःची एक फॅशन क्लोथिंग लाईन स्त्रियांसाठी सुरु केली आहे त्याच नाव नुश आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रब ने बना दी जोडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रणवीर सिंह, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, सुरेश रैना, जोहेब यूसुफ, रणबीर कपूर या व्यक्तींसोबत तिचे नाव जोडले गेले. २०१७ मध्ये तिने विराट कोहली सोबत लग्न केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !