बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्या जोड्या प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर खूप पसंत केल्या. तसेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या जोड्या अनेकदा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय सुद्धा ठरल्या होत्या. मात्र असे असेही अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी सुपरस्टार असून देखील मुख्य भूमिका म्हणून एकत्र काम केले नाही. हे कलाकार बॉलीवूड मधील हिट कलाकारांपैकी एक मानले जातात त्यांनी चित्रपट सृष्टीत एकत्र काम सुद्धा केले आहे पण कोणत्याच चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिकेत एकत्र काम केले नाही. चला तर मग अशा अभिनेता आणि अभिनेत्रींवर एक नजर टाकुयात.
आमिर खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन –
अमिर खान आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोन्ही कलाकार बॉलीवूड मधील उत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. ऐश्वर्या रायने बॉलीवूड मधील अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे मात्र तिने कधीच आमिर खानची अभिनेत्री म्हणून काम केलेले नाही. ऐश्वर्याने अमीर च्या मेला या चित्रपटात काम केले होते मात्र या चित्रपटातील तिची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती. मेला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना ने काम केले होते.
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण –
हृतिक आणि दीपिका हे दोन्ही कलाकार आजपर्यंत कोणत्या चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. दीपिका आणि हृतिक हे दोघेही सध्या बॉलीवूड मधील टॉप चे कलाकार म्हणून ओळखले जातात. मात्र तरीही त्यांनी कधीच एकत्र काम केलेले नाही.
अमीर खान आणि प्रियंका चोपडा –
अमीर आणि प्रियांका हे दोघेही बॉलीवूड सुपरस्टार आहेत. दोघांनी सुद्धा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र हे दोघे कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसले नाहीत.
शाहरुख खान आणि रेखा –
शाहरुख खान आणि रेखा हे दोघेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. रेखा ही सुपरस्टार अभिनेत्री आहे तर शाहरुख खान ला बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखले जाते. आपण सर्वांनीच रेखा आणि शाहरुखला बऱ्याचदा अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र मस्ती करताना पाहिले आहे. मात्र या दोघांनी कधीच कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिकेत एकत्र काम केले नाही.
अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी –
अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये खूप काळापासून काम करत आहेत. मात्र या दोन्ही सुपरस्टार कलाकाराने कधीच कोणत्याही चित्रपटात मुख्य भूमिका म्हणून एकत्र काम केले नाही. अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी या दोघांना बॉलिवुडच्या टॉप कलाकारांपैकी एक मानले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !