Headlines

अखेर कियारा अडवाणीने शेअर केला लग्नाचा व्हिडिओ, पाहताच येतील डोळ्यांमध्ये आनंदाश्रू !

मित्रांनो लग्न समारंभ म्हटलं की गोंधळ, मजा – मस्ती आलीच. जेव्हा लग्न जमते, त्या लग्नाची तयारी अनेक महिन्यांपासून केली जाते. एक दिवसाचे लग्न असते परंतु त्याची पूर्वतयारी आपल्याला सात ते आठ महिने पूर्वी करावी लागते. लग्न समारंभ हे सर्वसामान्य लोकांचे असू द्या की, सेलिब्रिटी लोकांचे असू द्या धावपळ अन् पूर्वतयारी ही आलीच.

प्रत्येकाला स्वतःच्या लग्नाची एक वेगळीच उत्सुकता असते. लग्न म्हणजे असा समारंभ जेथे दोन कुटुंब एकत्र येतात. आपण आपल्या जोडीदारासोबत भविष्याचे अनेक स्वप्न रंगवत असतो. हे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नशील देखील असतो. नवरा आणि बायको यांचे पवित्र नाते यांचे प्रतीक असणारे समारंभ म्हणजे लग्न असे मानले जाते.

आतापर्यंत आपण अनेकांनी सेलिब्रिटी कपल यांचे ग्रँड सेलिब्रेशन असलेले लग्न पाहिले आहे. सेलिब्रिटी म्हटले की प्रत्येकाला एक वेगळीच उत्सुकता असते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका सेलिब्रिटीच्या लग्नाबद्दल सांगणार आहोत. नुकतेच काही दिवसापूर्वीच बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न झाले. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळाली.

कियारा ने स्वतः त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कियारा लग्न मंडपामध्ये येताना दिसत आहे आणि तिची वाट सिद्धार्थ पाहत आहे. जेव्हा कियारा मंडपामध्ये येते तेव्हा या दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्रित या काम केले होते तो चित्रपट म्हणजे शेरशाह. या शेरशाह चित्रपटातील गाणे बॅकग्राऊंडला लावण्यात आले होते आणि या गाण्यावरच कीयाराने एन्ट्री केली. कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनी अतिशय सुंदर वस्त्र परिधान केले होते.

दोघे अतिशय आनंदी देखील दिसत होते. दोघांना पाहून अनेकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू देखील आले. कियारा ने वरमाला समारंभ मध्ये गुलाबी रंगाचा लहंगा परिधान केलेला होता. हा लहंगा मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केला होता. सिद्धार्थने क्रीम कलरचे आयोरी शेरवानी परिधान केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


वरमाला समारंभामध्ये दोघांच्यात खूप सारी मस्करी देखील झाली आणि बघणाऱ्यांच्या नजरा अतिशय मोहक झाल्या होत्या कारण की सिद्धार्थ आणि कियारा अत्यंत गोड दिसत होते. अगदी नजर लागेल असा त्यांचा लूक होता. अनेकांना ही जोडी म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल छिमा यांची शेरशाह चित्रपटातील जोडी आहे की काय असा भास देखील होत होता.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व कुटुंबीयांच्या समावेत आपल्या लग्नाची गाठ बांधली. यांचे लग्न राजस्थान येथील जैसलमर स्थित सूर्यगड पॅलेस येथे पार पडले.