लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कियारा अडवाणी प्रेग्नंन्ट ? या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण !

bollyreport
4 Min Read

सेलिब्रिटींचे लग्न समारंभ म्हणजे एक वेगळाच थाटमाट असतो. या लग्नांची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असते. सेलिब्रिटी लग्न कसे करणार आहेत तसेच लग्नामध्ये एकंदरीत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जाणार आहे?, या सर्वांची माहिती अनेक माध्यम संस्था त्यांच्या चाहत्या वर्गाला दाखवत असतात. अनेकदा लग्नानंतर सेलिब्रिटी कपल कुठे जाणार आहेत किंवा पुढे काय काय गोष्टी करणार आहेत याबद्दल देखील अनेक वृत्त संस्था आपल्याला माहिती देत असतात.

गेल्या आठवड्यातच म्हणजेच 7 फेब्रुवारीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या लग्नाची गाठ बांधली. या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी या जोडीला भरभरून प्रेम देखील केले परंतु आत्ताच एक घटना समोर देखील आली आणि या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत.

वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या जोडीबद्दल केल्या जात आहेत. नुकतेच हे जोडपे मुंबई एअरपोर्टवर दिसले यावेळी कियारा अडवाणी ने असे काही हालचाली केल्या ज्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याची हवा तयार झालेली आहे आणि हीच घटना संपूर्ण बॉलीवूड मध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न होऊन तीन ते चार दिवस देखील झाले नाही परंतु त्यांच्या प्रेग्नेंसीची हवा सगळीकडे पसरलेली आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, कियारा सुद्धा आलिया भट प्रमाणेच लग्नाआधी प्रेग्नेंट आहे. हीच प्रेग्नेंट असल्याची बातमी सगळीकडे चर्चेत आलेली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ ट्रोल देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेर मधील सूर्यगड येथे लग्न केले. या दोघांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले. या दोघांनी लग्नामध्ये परिधान केलेले वस्त्र यांच्या सौंदर्यामध्ये भर टाकत होती. लग्न झाल्यानंतर कियारा जेव्हा राजस्थान एअरपोर्ट वर आकी तेव्हा तिने ब्लॅक ट्राउझर आणि ग्रे शॉल घातली होती.

कियारा चा हा लूक पाहूनच लोकांनी मनामध्ये अंदाज देखील बांधला होता की ही नक्कीच काहीतरी सर्वांपासून लपवत आहे. त्याचबरोबर लवकरच कियारा आई बनणार आहे की काय? अशी देखील शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. परंतु आता कियारा जेव्हा मुंबई एअरपोर्टवर आली तेव्हा तिने केलेल्या अनेक हालचाली या संशयास्पद दिसून येत होत्या यामुळे लोकांच्या संशयाला अधिकच वाव मिळत आहे. त्यांच्या मनामधील असलेली शंका खरी होते की काय? हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


मुंबई एयरपोर्ट वर केलेल्या लुकमुळे झाली ट्रोल – कियारा आडवाणी जैसलेमर एयरपोर्ट वर घातलेल्या कपड्याप्रमाणेच मुंबई एयरपोर्ट वर घातलेल्या कपड्यांवरून देखील आता ट्रोल होत आहे. तसे पाहायला गेले तर कियाराने पिवळ्या रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता परंतु पोटाजवळ हा सूट ढिला असणे आणि कियाराने वारंवार ओढणीने आपले पोट झाकणे अशा प्रकारच्या हालचाली या काही संशयापद वाटत होत्या. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, कियारा अडवाणी सध्या प्रेग्नेंट नाहीये. ही तिची स्टाईल आहे जी सूट आणि ओढणीला ती अशाप्रकारे कॅरी करते.

सिद्धार्थ-कियारा यांचा मुंबईमध्ये पार पडेल रिसेप्शन सोहळा – रिपोर्टरच्या मते, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी त्यांच्या लग्नाची शानदार पार्टी मुंबईमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देणार आहेत. त्याचबरोबर रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार या पार्टीला शाहरुख खान ,अजय देवगन-काजोल यांच्या बरोबरच अनेक बॉलीवूडमधील स्टार कास्ट उपस्थित राहणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला संपूर्ण अंबानी परिवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.