Headlines

लग्नानंतर सिद्धार्थ आणि किनारा राहणार तब्बल इतक्या करोडच्या घरात, घराचा व्हिडीओ आला समोर !

नुकतेच सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह झाला. यांच्या विवाहांचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्हा सर्वांना पाहायला मिळाले असतील. सर्वांनी या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट देखील केल्या. अनेकांनी या जोडप्यांना पुढील आयुष्य सुखाने समाधानाने जगण्यासाठी खूप आशीर्वाद देखील दिले.

नुकतेच लग्न झाल्यानंतर दिल्लीमध्ये या दोघांनी एक रिसेप्शन नातेवाईकांना दिले आणि आता हे जोडपे मुंबईच्या दिशेने आलेले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे दोघे लग्न झाल्यानंतर 70 करोड रुपयांच्या किंमत असलेल्या घरामध्ये राहणार आहेत आणि या घराच्या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही देखील कदाचित पाहिलेला असेल.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि त्यांनी आपल्या या नात्याबद्दल गुप्तता देखील पाळली होती. सिद्धार्थ आणि कियारा यांनी 7 फेब्रुवारी 2023 ला आपल्या कुटुंबीयांच्या तसेच आप्तेष्टमंडळीच्या साक्षीने एकमेकांना सुखी आयुष्य जगण्याचे वचन दिले. या दोघांचा विवाह जैसलमेर येथील सूर्य गड पॅलेस येथे झाला.

आतापर्यंत सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे वेगळे राहत होते. आता लग्नानंतर हे दोघे एकत्र राहणार आहेत. यासाठी या दोघांनी मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. या घराची किंमत 70 करोड च्या आसपास आहे, असे सांगितले देखील जात आहे. या जोडप्याच्या घराचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा या घरांमध्ये राहतील एकत्र – या व्हिडिओमध्ये असलेले घर सिद्धार्थ आणि कियारा यांनी काही दिवसांपूर्वीच विकत घेतलेले आहे. या घरामध्ये ते दोघे भविष्यात एकत्र राहणार आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार हे घर खरेदी करण्यापूर्वी या दोघांनी अनेकदा वेगवेगळी घरी देखील पाहिली. खूप सारे घरे पाहिल्यानंतर शेवटी हे घर या दोघांना आवडले. या दोघांचे घर मुंबई मधील पाली हिल या भागामध्ये आहे. हे घर खूपच आलिशान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


नव जोडप्यांचा 70 करोड किमतीच्या घराचा व्हिडिओ होतोय व्हायरल – सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये घराच्या आतील बाजू काही दाखवण्यात आली नाही, परंतु हे घर नेमके कोणत्या अपार्टमेंट मध्ये आहे याबद्दल सांगण्यात आलेले आहे. या घराबद्दल असे देखील म्हंटले जात आहे की या घराच्या टेरेसवरून अरेबियन समुद्र चा खूप छान नजारा नक्कीच दिसू शकतो. या घराची किंमत 70 करोड रुपये आहे, असे देखील म्हटले जात आहे. सध्या सिद्धार्थ आणि कियारा यांचे नवीन घर जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत हे दोघेही त्यांच्या जुन्या घरामध्येच राहणार आहे.

कियारा आणि सिद्धार्थ आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी मुंबईमधील आपल्या बॉलिवूड क्षेत्रातील मित्रमंडळी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एक मोठी रिसेप्शन पार्टी ठेवत आहे. या पार्टीमध्ये अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसेच अंबानी कुटुंब, शाहरुख खान, अजय देवगन – काजोल यासारख्या सेलिब्रिटींचा देखील समावेश होऊ शकतो असे सूत्रांद्वारे सांगण्यात आले आहे..