Headlines

कियारा आणि सिद्धार्थच्या रिसेप्शनचा खर्च पाहिला तर बसेल तुम्हाला शॉक !

७ फेब्रुवारी रोजी कियारा आणि सिद्धार्थचे लग्न पार पडले. अजूनही त्यांचे पोस्ट वेडिंग फंक्शन सुरूच आहेत. राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये देखील त्यांनी लग्नाचे ग्रँड रिसेप्शन केले. या रिसेप्शनला अनेक मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री आल्या होत्या. कियारा आणि सिद्धार्थ दोघेही खूप खुश आहेत.

लग्नाच्या दिवशी या दोघांनीही पेस्टल रंगाचे आउटपुट घातले होते यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते. लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ आणि किया राजा हा पहिल्यांदा कॅमेरासमोर आले तेव्हा त्या दोघांनीही लाल रंगाचा मॅचिंग ड्रेस घातला होता. यामध्ये ते दोघेही खूप आनंदी आणि खुश दिसत होते.

लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ आणि कियाराचे पहिले रिसेप्शन झाले ते दिल्लीमध्ये जे ९ फेब्रुवारी रोजी झाले. तिथून आल्यानंतर बॉलीवूड मधल्या अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी मुंबईमध्ये एक रिसेप्शन ठेवले गेले. मुंबईमध्ये १२ फेब्रुवारी रोजी हे रिसेप्शन होते. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतरच्या रिसेप्शनला झालेला खर्च जर पाहिला तर सगळ्यांचेच उडून जातील. साउथ मुंबईतील द एसटी रेगीस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे रिसेप्शन झाले. हे हॉटेल रॉयल तर आहेच पण त्याचा खर्च देखील भरपूर आहे.

हे हॉटेल संपूर्ण एका प्रायव्हेट प्रॉपर्टीवर बनले आहे. या हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी सेलिब्रिटीज खूप मोठी रक्कम खर्च करतात. या हॉटेलमध्ये जो हॉल आहे तो सगळ्यात वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे येथे न्यूज मधल्या कॅमेरामनचा कॅमेरा पोहोचू शकत नाही. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज इथेच कोणतेही पार्टी किंवा फंक्शन करण्यासाठी हा हॉल बुक करतात. सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या लग्नाच्या दिवशी नाही तर त्यानंतर सगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. रिसेप्शन चे फोटो देखील नंतरच आपल्याला पाहायला मिळाले.

मीडिया रिपोर्ट नुसार या हॉलचा खर्च १५ ते २० लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त ३५०० – ३६०० रुपये इतका किंवा त्यापेक्षा जास्त खर्च एका खाण्याच्या प्लेटसाठी द्यावा लागतो. यासोबतच ड्रिंक वगैरे या सगळ्याचा खर्च वेगळा या सगळ्याचा खर्च बघता कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी ५० ते ७० लाख रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. लग्नाच्या रिसेप्शनसाठी कीयारा आणि सिद्धार्थची गेस्ट लिस्ट देखील भरपूर मोठी होती. यामध्ये बॉलीवूड मधले अनेक मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश होता.

एकंदरच कियारा आणि सिद्धार्थचे लग्न त्यानंतर झालेले दोन रिसेप्शन हे अत्यंत ग्रँड पद्धतीने साजरे केले गेले. या सगळ्यावर भरपूर खर्च देखील केला गेला. राजस्थानमध्ये लग्नाच्या वेळेस कियाराने लाईट गुलाबी रंगाचा शेड असलेला घागरा आणि हिरा पन्नाची ज्वेलरी घातली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती ज्याला गोल्डन टच होता. सिद्धार्थ आणि कियारा दोघेही या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते. या दोघांची जोडी एकमेकांसोबत छान दिसते. शेरशहा या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये या जोडीने चांगलेच घर केले.