अखेर करण जोहरने सांगितले कार्यक्रम से’क्स बद्दलचे प्रश्न का विचारतो !

bollyreport
3 Min Read

करण जोहरचा कॉफी विथ करण हा खूप लोकप्रिय शो आहे. त्याच्या आताच्या नवीन सीझनला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सेलिब्रिटींच्या से’क्स लाईफबद्दल प्रश्न विचारल्यामुळे करणला ट्रोल करण्यात येत आहे. लोकांनी तर हा चॅट शो आहे की से’क्स शो असे म्हटले आहे. करण जोहरने बरेच दिवस या ट्रोल्सवर मौन पाळले होते, पण आता त्याने यावर मौन सोडले असून त्याला कलाकारांकडून त्यांचे बेडरूमचे सिक्रेट का जाणून घ्यायचे असते ते सांगितले.

करण जोहरच्या शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये से’क्स’बद्दल चर्चा होते. शोमध्ये आलेले सर्व पाहुणे, मग ते विवाहित असोत की अविवाहित, करण जोहर त्यांना त्यांच्या से’क्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो. करणने आलिया भट्ट, रणवीर सिंग, सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा,

समंथा रुथ प्रभू आणि करीना यांच्यासारख्या जवळपास प्रत्येक सेलिब्रिटींसोबत त्यांच्या बेडरूम सिक्रेटबद्दल गप्पा मारल्या आहेत. यामुळे करण सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतो. आता या शोचा सातवा सीझन संपला असून, करणने से’क्स प्रश्नांबाबतचे सत्य सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत करण म्हणाला की, मला जे आवडते तेच मला करायचे असते. मला कॉफी विथ करणमधून आनंद मिळतो. मला या शो संबंधित अनेक प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत. त्यात “करण आलियाबद्दल इतके का बोलतो? तो लोकांच्या लैं’गि’क जीवनावर प्रश्न का विचारतो.”

बेडरुन सिक्रेटच्या प्रश्नांबद्दल करणने सांगितले की, “कदाचित मला लोकांच्या लैं’गि’क जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, म्हणून मी त्यांना असे प्रश्न विचारतो. मला आलियाचा खूप अभिमान आहे. कदाचित म्हणूनच माझ्याकडून बोलताना तिचा अनेकदा उल्लेख केला जातो. बाकी मी कशाचा जास्त विचार करत नाही. पण मला आश्चर्य वाटते की लोक या विषयावर लांबलचक पॅरा लिहितात.

पण हा फक्त टॉक शो आहे हे लोकांना का समजत नाही. हा केवळ एक मजेदार टॉक शो आहे.” पण लोक मोठ मोठे पॅरेग्राफ लिहून या गोष्टीचे विश्लेषण लिहित असतात. ते सर्व वाचायला मी माझा वेळ देऊ शकत नाही. मला माहितही नाही ते काय करत असतात.

करणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा आलिया आणि रणवीर या कलाकारांसोबतचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.