Headlines

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अरबो रुपयांच्या संपत्तीचा मालक असेल ह्या व्यक्ती ?

रविवारची सकाळ ही समस्त संगीत प्रेमींसाठी ही एक दुखद सकाळ ठरली काऱण गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा मृत्यू झाली. लता दीदी या ९२ वर्षांच्या होत्या. त्या आता शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज त्यांच्या रसिकांच्या मनात सदैव तसाच राहिल. त्यांच्या अकाली जाण्यामुळे संगीत विश्वाचे खुप नुकसान झाल्याच्या सर्वत्र प्रतिक्रिया येत आहे. लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केले नाही. त्यांचा वारस असं कोणीच नव्हता. त्यामुळे त्यांच्या पाठी त्यांच्या संपत्तीचा वारस कोण असा प्रश्न सध्या उद्धभवला आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला. त्यांचे वडिल दीनानाथ मंगेशकर एक मराठी संगीतकार, शास्त्रीय गायक आणि थिएटर एक्टर होते. त्यांची आई गुजराती होती. लता यांनी बालपणापासुन त्यांच्या वडिलांकडुन संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या १३ वर्षी त्यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छप्पर गेले. त्यामुळे कमी वयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. पण तरीही त्यांनी मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी संगीत क्षेत्रातच त्यांचे करीयर केले आणि त्यातुनच बक्कळ पैसा कमावला. या व्यतिरिक्त मुंबईतसुद्धा त्यांच्याकडे काही इन्व्हेंस्टमेंट होती.

लता दीदी यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे घर आहे. त्यांच्या घराचे नाव प्रभु कुंज भवन. असे म्हणतात कि या घरात १० परिवार एकत्र राहु शकतात एवढे ते मोठे आहे. तसेच मुंबईत सुद्धा अनेक घरे आहेत जी सध्या भाड्याने दिली आहे.
लता दीदी या जरी सर्वसाधारण जीवन जगायच्या तरी त्यांना लग्झरी कारची खुप आवड होती. त्यांच्याकडे ब्यूक, शेवरले, क्रिसलर सारख्या गाड्या होत्या. वीर झारा चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर यश चोपड़ा यांनी त्यांना मर्सिडीज कार गिफ्ट केली होती.

लता दीदी यांनी त्यांच्या संगीताच्या जोरावर करोडो रसिकांच्या मनात जागा तर बनवली पण त्यासोबत सन्मान , पुरस्कार आणि संपत्ती सुद्धा जमावली. त्यांची नेटवर्थ 50 मिलियन डॉलर म्हणजे 370 करोड़च्या आसपास होती. लता दीदी यांना दागिन्यांची सुद्धा खुप आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडे सोने आणि हिऱ्याची दागिने होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांची संपत्ती ही त्यांचा भाऊ आणि ३ बहिणींमध्ये वाटली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी कधीच लग्न केले नाही किंवा कोणाला दत्तक सुद्धा घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या संपत्ती वर त्यांच्या भावाबहिणींचा हक्क असल्याचे बोलले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !