Headlines

या कारणामुळे गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी लग्न केले नाही, स्वतःच सांगितले होते कारण !

सूर सम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजुन १२ मिनीटांनी देहांत झाला. ८ जानेवारी रोजी त्या कोराना संक्रमित असल्याचे निदर्शनास आलेले. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालवत गेली. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनासोबतच निमोनिया सुद्धा झालेला. त्यामुळेच त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्या आयसीयु मध्ये मृत्युशी झंज देत असल्यामुळे त्यांचे लाखो करोडो चाहते त्यांच्या प्राणांसाठी सतत प्राथर्ना करत होते. पण त्यांच्या प्राथर्नांना यश आले नाही आणि त्या सगळ्यांना सोडुन निघुन गेल्या.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदोर येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हेमा असे होते. त्या एका मध्यमवर्गीय मराठी परिवारात मोठ्या झाल्या. लता मंगेशकर यांच्या पाठी आणखी चार भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केले नाही. आज आम्ही तुम्हाला या मागील कारण सांगणार आहोत.

लता मंगेशकर यांचे वडिल कलाकार आणि संगीतकार होते. वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन लता दीदींनी सुद्धा संगीताशी नाते जोडले. जो पर्यंत लता मंगशकर यांचे वडिल होते तो पर्यंत सर्व काही आलबेल होते मात्र वयाच्या १३ वर्षीच लता यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छप्पर उडाले. वडिलांनंतर त्याच घरातील मोठ्या असल्याने त्यांच्या खांद्यावर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी आली.

कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी लहान वयातच बाहेर पाऊल टाकले. त्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण ही धड पुर्ण करता आले नाही. याबाबतीत त्यांनी स्वता एका मुलाखतीत सांगितले होते. त्या म्हणाल्या की त्या १३ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आली. मी आमच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी त्यामुळे कमी वयातच कमावु लागले. अनेकदा मनात लग्नाचा विचार आला परुंतु तो अमलात आणला नाही. भावंडाना सांभळतानाच वेळ निघुन गेला आणि सोबतच लग्नाचे वयही निघुन गेले.

लता मंगेशकर जरी भारताच्या शान असल्या तरी एक काळ असा ही होता जेव्हा त्यांना त्यांच्या आवाजामुळेच रिजेक्ट केले होते. त्यांच्या बारीक आवाजामुळे त्यांना चित्रपटातुन नाकारण्यात आले होते. पण प्रचंड मेहनतीच्या बळावर त्यांनी त्यांचे नाव संपुर्ण विश्वाच्या ह्रदयात कोरले. लता मंगेशकर यांनी ५० हजार हुन अधिक गाणी गायली आहेत. त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरीक सन्मान असणाऱ्या भारत रत्न, पद्म भूषण आणि पद्म विभूषण सोबतच तीन राष्ट्रीय आणि ४ फिल्मफेअर पुरस्कांरांनी गौरवण्यात आले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !