बॉलिवुड सुपरस्टार सलमान खान आणि एकेकाळची टॉपची अभिनेत्री जुही चावला यांना फारसे कधी एकत्र पाहिले गेले नाही. किंबहुना त्यांनी चित्रपटासुद्धा कधी एकत्र काम केलेले नाही. त्यामागचे कारण म्हणजे जुहीने एकदा सलमान खानचा अपमान केला होता. याचा बदला म्हणुन सलमानने सुद्धा काही वर्षांनी तसाच काहीसा प्रकार केला. चला तर जाणुन घेऊ सलमान आणि जुही मध्ये नेमके असे काय घडले होते.
जेव्ह प्रत्येक अभिनेता जुही सोबत काम करु इच्छित होता.
गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा जुही चावला एक टॉपची अभिनेत्री होती. त्यावेळी प्रत्येक अभिनेता तिच्यासोबत काम करु इच्छित होता. त्याचवेळी सलमान खानचे चित्रपट फारसे चालत नव्हते. पण असे असुन देखीन निर्माता दिग्दर्शकांसाठी तो सुद्धा एक स्टारच होता.
त्यावेळी एका दिग्दर्शकाला सलमान आणि जुहीला एकत्र घेऊन एक चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाची ऑफर घेऊन ते जुही कडे गेले होते. मात्र जुहीने सुरुवातीला ती ऑफर खुप वेळ रखडवुन ठेवली आणि मग अचानक त्या चित्रपटात सलमान ऐवजी अमीर खानला रिप्लेस करण्यास सांगितले. परंतु दिग्दर्शकांना सलमान आणि जुहीची जोडी आवडली होती. त्यामुळे जहीची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे तिने तो चित्रपट करण्यास नकार दिला.
सलमानला ही गोष्ट ऐकुन खुप वाईट वाटले होते.
सलमानला ही गोष्ट ऐकुन खुप वाईट वाटले होते. या गोष्टीला तो त्याचा अपमान समजला. हा अपमान सलमान कधीच विसरला नाही व त्याने कधी जुही सोबत काम सुद्धा केले नाही. कालांतराने जुहीचे स्टारडम कमी होत गेले. ती चित्रपटांमध्ये साईड रोल किंवा आईच्या भुमिकांमध्ये दिसु लागली. तर दुसरी कडे सलमान मोठा स्टार बनला.
सलमानच्या मनात जुहीबद्दल एक सल होतीच.त्यामुळे सलमानने जुहीला आजपर्यंत भाव दिलेला नाही. त्यानंतर एकदा बिगबॉसमध्ये गेस्ट म्हणुन आल्यावर जुहीने सांगितले होते कि तिने आतापर्यंत सर्व अभिनेत्यांसोबत काम केले आहे केवळ सलमान सोबत केले नाही. आता मात्र मला सलमानसोबत काम करण्याची इच्छा आहे.
सलमानने अशा प्रकारे घेतला होता जुहीचा बदला.
पण जुहीच्या अशा मागणीवर सलमानने तिला चित्रपटात त्याची आई बनण्याची ऑफर दिली. त्यामुळे जुहीला त्याच्या अशा बोलण्याचा शॉक लागला. जुहीचे वय इतके ही नाही की त्याच्या आईचा रोल करेल. जुहीशी अशा प्रकारे बोलुन सलमानने त्याचा बदला घेतला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !