Headlines

अखेर समांथा अक्किनैनी आणि नागा चैतन्य विभक्त झाले, घ’ट’स्फो’टां’नंतर समांथाला मिळणार तब्बल एवढी पोटगी !

साऊथमधील प्रसिद्ध कलाकार समंथा अक्किनेनी व नागा चैतन्य यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याच्या बातम्यांना हल्ली उधाण आलं होतं. हे दोघे ही लवकरच घ*ट*स्फो*ट घेणार आहेत हा चर्चेचा विषय ठरला आहे. या सर्व चर्चांबाबत आता स्वत: अभिनेत्रीने अधिकृत निवेदन जारी करून या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले आहे.

समंथाने हल्लीच एक वक्तव्य केले आहे, ज्यात तिने चाहत्यांना आणि माध्यमांनाही या प्रकरणात त्यांना प्रायव्हसी देण्याचे आवाहन केले आहे. समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितले आहे की, ‘आमच्या सर्व हितचिंतकांना – अनेक विचार – विमर्श करून मी आणि चेय (नागा चैतन्य) ने पती -पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही एक दशकाहून अधिक काळ असलेली आमच्यातील मैत्री आमच्या नात्याचा मूळ हिस्सा होती आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्यात नेहमीच एक विशेष बंधन राहील. पुढे ती म्हणाली, ‘आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला आमची प्रायव्हसी द्या जेणेकरून आम्ही यातून पुढे जाऊ शकू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


समंथा आणि नागा चैतन्य काही दिवसांपासून घ*ट*स्फो*टाच्या बातमीवर गप्प होते. अहवालांनुसार, घ*ट*स्फो*टा*चा निर्णय घेतल्यानंतर सामंथा आणि नागा चैतन्य यांचे कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन करण्यात आले, तरीदेखील या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय बदलला नाही. समंथाला पोटगी म्हणून ५० कोटी रुपये मिळतील.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी गोव्यामध्ये ६ ऑक्टोबर २०१७ रोजी हिंदू रीतिरिवाजांनंतर आणि नंतर ७ ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न केले. लग्नानंतर, समंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी आडनाव लावले होते, मात्र विभक्त होण्याच्या बातम्या समोर येऊ लागताच, समंथाने तिच्या ट्विटर हँडलवरून अक्किनेनी नाव काढून टाकले आणि ते बदलून समंथा रूथ प्रभू केले. ६ ऑक्टोबर रोजी दोघेही लग्नाला चार वर्षे पूर्ण करणार होते, पण त्या आधीच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !