Headlines

कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नासंदर्भात कं’डो’म कंपनीने केली अशी पोस्ट, झाली सर्वत्र चर्चा !

बॉलिवुडचे सध्याचे बहुचर्चित कपल अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि अभिनेता विकी कौशल हे ९ डिसेंबरला राजस्थान मध्ये विवाहबंधनात अडकले. सध्या सर्वत्र या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसत आहे. हे लग्न राजस्थानातील माधोपुर जिल्ह्यातील बरवारा मधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये संपन्न झाले. या दोघांच्या लग्नाचे सोशल मीडियावर सुद्धा उधाण आलेले दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)


या दोघांच्या लग्नाच्या बाबतीत ड्युरेक्स कंपनीने एक पोस्ट टाकली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ब्रॅण्डने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे कि, डियर विकी आणि कॅटरिना आम्हाला बोलावले नाहीत तर नक्कीच ही एक गंमत असेल. सध्या ही पोस्ट खुप व्हायरल होत आहे. कंमेट सेक्शनमध्ये त्यांचे फॅन्ससुद्धा आता मजा घेऊ लागले आहेत. लोक यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहीले की, डुड वॉव यार, तर दुसऱ्याने लिहिले की आतापर्यंतची सर्वात भारी जाहिरात आहे. तर एकाने लिहिले की इलाजापेक्षा बचाव महत्वाचा. ड्युरेक्स कंपनीची अशाप्रकारे पोस्ट टाकायची ही पहिलीच वेळ नाही. या आधी दिपिका-रणवीर, विराट -अनुष्का यांच्या लग्नाच्यावेळी सुद्धा मजेशीर पोस्ट टाकल्या होत्या.

या लग्नात सहभागी झाल्या मोठ्या व्यक्ती – लॉकडाऊन उघडल्यानंतर या राज्यात प्रियंका आणि निक नंतर होणारे हे दुसरे मोठे लग्न आहे. हे जोडपे मंगळवारी जयपुरला पोहचले. त्यानंतर सवाई माधोपुर पर्यंतचा प्रवास त्यांनी कारने केला. कॅटरिना आणि तिची आई अजमेर दरगाह शरीफ येथे काही काळासाठी थांबल्या होत्या. जे जोडपे मुंबईहुन निघताना कॅमऱ्यात कैद झाले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !