Headlines

या देशाचा राजा प्रत्येक वर्षी एका कुमारी मुलीसोबत करतो लग्न, त्याला आहे तब्बल एवढ्या बायका आणि मुलं !

देशाच्या राजावर अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्याचे पालन करणे त्याला अनिवार्य असते. राज्याचे सुख दुख जाणुन घेणे हे राजाचे कर्तव्य असते. सध्या जगातील अनेक देशांमधुन राजेशाही संपुष्टात आली आहे. मात्र तरीही काही देशांत राजेशाही आजही आहे. त्यातीलच एक म्हणजे अफ्रिकी देश स्वाजीलॅण्ड. येथील राजाची माहिती ऐकलात तर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

या राजाचे नाव आहे राजा मस्वाती तृतीय – या देशाला ५० वर्षे पुर्ण झाल्यावर त्या राजाने २०१८ मध्ये देशाचे नाव बदलुन द किंगडम ऑफ इस्वातिनी असे केले. हा देश अफ्रिका महाद्वीप मध्ये दक्षिणेकडे वसला आहे. या देशात दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महाराणीच्या आईच्या शाही गावात लुदजिजीमध्ये उम्हलांगा सेरेमनीच आयोजन केले जाते. त्या कार्यक्रमात १० हजार पेक्षा जास्त युवती आणि मुली सहभाग घेतात. तेथील राजाच्या समोर त्या कुवाऱ्या मुली डान्स करतात.

असे म्हणतात कि दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलींपैकी एकीसोबत राजा लग्न करतो. विशेष म्हणजे या मुली कपडे न घालताच राजा आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रजे समोर नाचतात. या प्रथेला अनेक मुलींनी विरोध सुद्धा दर्शवला होता पण त्यामुळे त्याना राजा चा रोष पत्करावा लागला. व त्यांना आणि त्यांच्या कुंटुबाला शिक्षा सुद्धा भोगावी लागली.

या देशाचा राजा खुपच शौकिन असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तेथील जनता खुपच गरीबीत जीवन जगते. २०१५ मध्ये जेव्हा भारता शिखर संमेलन झाले होते त्यावेळी तेथील राजा त्याच्या १५ पत्नी, मुले आणि १०० नोकरांसोबत आला होता. त्याच्यासाठी दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील २०० रुम बुक केल्या होत्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !