Headlines

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नाला आलेल्या लोकांना दिला हा खास संदेश बघा !

कियारा अडवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या लग्नानंतर दिल्लीमध्ये एक ग्रँड रिसेप्शन ठेवले होते. या दोघांचे लग्न राजस्थानला सूर्यगड पॅलेसमध्ये झाले. या दरम्यानच सोशल मीडियावर एक इनविटेशन कार्ड वायरल होत होते. ज्यामध्ये या स्पेशल पार्टीला येण्यासाठी आमंत्रण दिले होते आणि ते क्षण आणखी आठवणीत राहणारे आणि आनंददायी बनवण्यासाठी विनंती केली होती. स्टार कपल हे बॉलीवूडमध्ये नेहमीच फेमस असतात. त्यांच्या लग्नाबाबतची आणि एकंदरीत सगळ्या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडेच होत असते.

कियारा आडवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ने लिहिली एक स्पेशल नोट – आमच्या लग्नाच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला इतके चांगले फॅमिली आणि फ्रेंड्स भेटल्याबद्दल आम्ही भाग्यशाली आहोत. हे सगळे एवढ्या लांब फक्त आमच्या लग्नासाठी आले त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. भरपूर प्या नाचा खेळा मज्जा करा आणि आमच्या लग्नाचा हा दिवस खूप आनंददायी आणि आठवणीत राहील असा बनवा. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप प्रेम कियारा आणि सिद्धार्थ. असे या नोटमध्ये लिहिले होते यासोबतच कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या अक्षराचा के आणि एस असे सिम्बॉल लिहिलेला एक कॉइन देखील प्रसिद्ध केला.

कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता आमची बुकिंग फिक्स झाली आहे. आम्ही आमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत राहूदेत अशी मागणी करतो. असे कॅप्शन देखील त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहिल्या होत्या. अत्यंत ग्रँड पद्धतीने आणि सगळ्या ट्रेडिशन पार पाडत कियारा आणि सिद्धार्थ ने लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra King🤴 (@sidmalhotra_lifeline)


राजस्थानला लग्न करून आल्यानंतर दिल्लीमध्ये सीड आणि कियाराने त्यांचे फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्ससाठी एक रिसेप्शन ठेवले आहे. यानंतर मुंबईत देखील सेट आणि कियाराच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ च्या लग्नाच्या फोटोना सगळेच लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कियाराचे फ्रान्स आणि सिद्धार्थचे फॅन्स देखील खूप खुश आहेत. सोशल मीडियावर सगळेच कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो शेअर करताना दिसत आहेत.

७ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थचा लग्न सोहळा पार पडला. जैसलमेर मधील सूर्यगड पॅलेस या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला सूर्यागड पॅलेसचे फोटो सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नासाठी या पॅलेस ला विशेष पद्धतीने सजवले गेले होते. शेरशाह या चित्रपटामध्ये कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनी एकत्र काम केले होते. कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती. यानंतर ते दोघे सतत टच मध्ये होते. शेरशहा या चित्रपटांमध्ये दोघांनी ऍज अ कपल म्हणून काम केले आहे.