Headlines

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने लग्नासाठी घातली विचित्र अट, जाणून घ्या !

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचा येऊ घातलेला चित्रपट अतरंगी रे मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर एक गाणे लॉण्च करण्यात आले. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे सोशल मीडियावर सध्या खुप पसंत पडत आहे. दरम्यान साराने एका इंटरव्ह्युमध्ये तिच्या लग्नाबाबत सांगितले. त्यात तिने तिला कसा नवरा हवा ते सांगितले तसेच तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी काही अटी सुध्या सांगितल्या आहे.

या मुलाखतीत तिने तिच्या आय़ुष्यातील काही पैलु सुद्धा उलघडुन सांगितले. साराने सांगितले कि ती अशाच मुलाशी लग्न करेल जो पुढे जाऊन तिची आई अमृता सिंह सोबत राहण्यास तयार असेल. ज्या आईने एक सिंगल मदर म्हणुन तिचा सांभाळ केला तिच्यासोबत जो राहिल त्याच्याशीच ती लग्न करणार असल्याचे साराने सांगितले.

आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष लिड रोलमध्ये असणार आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लव्ह ट्रॅगलवर आधारित असलेला हा चित्रपट एआर रेहमानने संगीतबद्ध केला आहे. डिज्नी प्लस हॉट स्टारने २०० करोड रुपये या चित्रपटासाठी दिले आहेत. साराला जेव्हा तिच्या लग्नाबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली की जो मुलगा माझ्या आईसोबत राहु शकेल अशाच मुलाशी मी लग्न करणार आहे. मी तिला कधीच दूर करु शकत नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ती माझा तिसरा डोळा आहे.

एका मुलाखतीत तिने तिच्या आईवडिलांचा घ*ट*स्फो*ट झाल्यावर स्वताला कसे सावरले होते याबाबत ही सांगितले. ती म्हणाली की जिथे दोन ऑप्शनस् एकमेकांसोबत खुष नसतील तर त्यांनी एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे झालेलेच चांगले. ते लोक वेगळे झाल्यावर आपापल्या आय़ुष्यात खुष असतील तर याहुन चांगली गोष्ट असुच शकत नाही. ते दोघे एकमेकांसोबत शेवटी खुष होत असे मला वाटत नाही त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा चांगला निर्णय घेतला. मी माझ्या आईसोबत राहते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि माझ्यासाठी सर्व काही आहे. माझे पप्पा सुद्धा माझ्यासाठी एका फोनवर हजर असतात. मी त्यांना मला हवे तेव्हा भेटु शकते.ते दोघेही आपापल्या आयुष्यात खुष आहे त्यामुळे त्यांची मुले देखील आनंदी आहे.

१९९१ मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंहचे लग्न झाले. १३ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी २००४ मध्ये घ*ट*स्पो*ट घेतला. तेव्हा सारा केवळ १० वर्षांची होती. तर इब्राहिम ४ वर्षांचा होता. त्या दोघांचे लग्न तुटल्याचा परिणाम सारा आणि इब्राहीम वर झाला. पप्पा घरी का येत नाही असे इब्राहिम सारखा विचारत असायचा.

साराच्या करीयर बद्दल बोलायचे झाल्यास तिने २०१८ मध्ये सुशांत सिहं राजपुत सोबत केदारनाथ चित्रपटातुन पदार्पण केले होते. त्यानंतर तिने रणवीर सिंग सोबत सिंबा चित्रपटात काम केले. २०२० मध्ये साराचा कार्तिक आर्यनसोबत लव आज कल आणि वरुण धवन सोबत कुली नंबर १ हा चित्रपट रिलिज झाला. आता ती अतरंगी रे मध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !