लग्न म्हटलं की महिन्याभराचा सोहळा असतो. शॉपिंग, सजावट, कार्यक्रम, विधी या सर्व गोष्टीला नाही म्हटलं तर महिनाभराचा कालावधी लागतो. त्या महिन्या भराच्या काळात घरातील प्रत्येक सदस्यासोबत नवरानवरीची सुद्धा धावपळ होत असते. या सर्व काळात एकमेकांना थोडा वेळ मिळावा थोडा एकांत मिळावा यासाठी लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य हनिमुन साठी जातात. तिथे जाऊन ते एकमेकांना ओळखुन घेतात.
एकमेकांच्या सवयी जाणुन घेण्याचा प्रयत्न करतात कारण तिथे त्यांना डिस्टर्ब करणारे कोणी नसतं. मात्र हनिमुनला काही जण अशा चुका करतात ज्या त्यांना पुढील आयुष्यासाठी भारी पडु शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही त्यांच्या छोट्या छोट्या चुकांबद्दल सांगणार आहोत.
फोन आणि सोशल मीडियापासुन दूर रहा – फोन किंवा सोशल मीडियाची सवय लागणे खुप वाईट सवय आहे. काही लोक रात्रंदिवस मोबाईलमध्येच मग्न असतात. पण तुमच्या हनिमुनला तुम्हाला या गोष्टींपासुन दूर राहिले पाहिजे. हनिमुन हा काही दिवसांचाच असतो. त्यावर तुम्ही खुप पैसा देखील खर्च करता. त्यामुळे त्याचे महत्व जाणुन तुम्हाला तिथला प्रत्येक सेकंद तुमच्या जोडीदारासोबत घालवता आला पाहिजे. तुम्ही जर तिथे मोबाइलमध्येच बिझी राहिलात तर तुमच्या जोडीदाराला वाईट वाटु शकते.
हवामानानुसार जागा निवडा – हनिमुनसाठी जागा निवडण्यापुर्वी तुम्हाला त्या जागेचे वर्तमानातील वातावरण कसे आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कित्येकदा काहींना वातावरण सुट होत नाही. त्यामुळे तिथे गेल्यावर मजा करण्या ऐवजी तेथील वातावरणाशी मिळतेजुळते करण्यातच वेळ जातो. हनिमुनपेक्षा त्या वातावरणाशी कसे दोन हात करावे यातच विचार करण्यात आपला वेळ वाया जातो. तसेच वातावरण खराब असल्यास तब्येत बिघडण्याची सुद्धा शक्यता असते.
जोडीदाराला सरप्राईझ द्या – सरप्राझझ मिळणे कोणाला नाही आवडत. त्यामुळे प्रत्येकाला आपण स्पेशल आहोत असे वाटते. त्यामुळे हनिमुनला जर तुम्ही सरप्राईझ प्लान केलात तर तुमच्या जोडीदाराला ते नक्कीच आवडेल. तुम्ही त्यांच्या आनंदाचा किती विचार करता याची प्रचिती तुमच्या जोडीदाराला येईल. त्यांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. त्यामुळे तिथे जाण्यापुर्वीच या सर्व गोष्टीची प्लॅनिंग करुन ठेवा.
जोडीदारासोबत भांडु नका – हनिमुनला तुम्ही एका नव्या ठिकाणी जात असता. त्यावेळी काहीदा अशीही वेळ येते जिथे तुमचे एकमेकांशी पटत नाही. मात्र ती वेळ जितके जमेल तितके टाळायचा प्रयत्न करा. हनिमुनला जाऊन एकमेकांशी भांडण्यात वेळ फुकट घालवु नका. एकमेकांना सावरुन घ्यायचा प्रयत्न करा. वेळ आल्याच प्रसंगावधान राखुन वेळ मारुन न्यायचा प्रयत्न करा तरच तुम्ही तुमचा हनिमुन आनंदात घालवु शकता.
आरोग्याची काळजी घ्या – नवी जागा, नवे वातावरण, बाहेरील खाणेपिणे , खुपसारा थकवा यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हनिमुनला गेल्यावर तब्येतीची काळजी घ्या. वातावरणानुसार कपडे घाला. सगळी आवश्यक औषध आठवणीने सोबत घ्या. जाण्यापुर्वी तब्येत खराब असल्य़ास डॉक्टरला एकदा दाखवुन घ्या. नाहीतर हनिमुन बिघडण्याची शक्यता असते.