Headlines

सुनील शेट्टीच्या मुलीच्या लग्नानंतर मुलाच्या लग्नाची होत आहे तयारी; फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल !

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. चित्रपट तडप या चित्रपट माध्यमातून तो बॉलिवूड क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. बुधवारी या चित्रपटाची मुंबईमध्ये स्पेशल स्क्रीनिंग ठेवली गेली होती,जेथे अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ देखील आपल्याला दिसली तान्या ला पाहताच लोक या दोघांच्या जोडीबद्दल चर्चा करू लागले. हे नेमके दोघं आहेत तरी कोण? यांच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का याची देखील चर्चा करू लागले.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अहान शेट्टी ची गर्लफ्रेंड तान्या एक फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तान्याला सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात. वर्ष 2015 मध्ये तान्या ने या क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले होते. सध्या ती लंडनमध्ये राहतेय. आतापर्यंतच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या फॅशन ब्रँड्स सोबत तान्या ने काम केलेले आहे आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिने स्वतःचे आगळे वेगळे स्थान देखील निर्माण केले आहे.

तान्या फॅशन इंडस्ट्री मध्ये कार्यरत असल्याने ती आपल्या फिटनेस वर खूपच लक्ष देते. हिला फिरण्याचा छंद आहे म्हणूनच जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनसोक्त फिरून येते. तान्या श्रॉफ खूपच स्टायलिश आहे. तान्याचे फोटो चाहते वर्ग खूपच लाईक करत असतात. जेव्हा जेव्हा तान्या सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते तेव्हा चाहता वर्ग जीव ओवाळून टाकतो.

अहान शेट्टी आपल्या चित्रपटासोबतच व्यक्तिगत जीवनामध्ये देखील खूपच चर्चित असणारे अभिनेता मानले जातात. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमां समोर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत.आपल्याला लव्ह लाईफ बद्दल जरी माध्यमांना त्यांनी काही सांगितले नसले तरी माध्यमांच्या नजरेपासून ते काहीच सुटत नाही. सोशल मीडियावर या कपलचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ सर्वांसमोर येतच असतात आणि म्हणूनच सोशल मीडियावर सध्या या दोघांचे रोमँटिक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

तान्या श्रॉफ चे वडील सुप्रसिद्ध उद्योगपती जयदेव श्रॉफ आहे. अहान तान्या चा भाऊ च्या शाळेमध्ये शिकायला होता, यादरम्यानच दोघांची मैत्री झाली. या दोघांची लव स्टोरी खूपच फिल्मी मानली जाते. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट देखील करत आहे. या दोघांना फिरण्याची आवड आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा हे दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतीत करतात.