Headlines

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीचे लग्न संपन्न, हळदीचा व्हिडीओ आला समोर !

आई कुठे काय करते ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून अखेर आता अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पाहतंय.

आशुतोष-अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाची लगबग – अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अरुंधतीने स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवल्या. मात्र आशुतोषमुळे अरुंधतीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. गाण्याची आवड जपता जपता आशुतोषच्या रुपात तिला आयुष्याचा साथीदार मिळाला.

Video Link –> https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/537654478244505
अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतकं भरभरुन प्रेम दिलं त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावलेत. अरुंधतीच्या या नव्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पाहावी लागणार आहे.

अरुंधतीचा नववधू लुक कसा आहे? 
‘नवरी सजतेय’ असं म्हणत स्टार प्रवाहने अरुंधतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुंधतीचा नववधू लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. भगव्या रंगाची पैठणी, कपाळावर मुंडावळ्या, हिरवा चुडा आणि चंद्रकोर असा अरुंधतीचा नववधू लूक आहे. या व्हिडीओवर खूप गोड आहे नवरी, खूपच सुंदर, आता लग्नाची प्रतीक्षा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.