Headlines

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती लग्न मधेच सोडून सोडून गेली पळून… !

आपल्यापैकी अनेकजण मनोरंजनासाठी वेगवेगळ्या चॅनेलवरील मालिका पाहत असतात. मालिकामुळे आपल्या जीवनाला थोडासा आराम देखील मिळतो. प्रत्येकजण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक तणावाला सामोरे जात असतो, म्हणूनच एक मनोरंजनाचा भाग म्हणून आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका पाहत असतो. तुम्ही देखील मालिका हमखास पाहत असाल. अनेकदा मालिकांमध्ये महाएपिसोड, वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळतात यामुळे मालिकांची रंगत अजूनच वाढत जाते.

अनेकदा मालिकांमध्ये घडणारे संघर्ष हा देखील टीकेचा व कौतुकाचा विषय असतो म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी सिरीयल हमखास पाहिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सर्वांच्या आवडत्या मालिकेबद्दल सांगणार आहोत, या मालिकेचे नाव आहे “आई कुठे काय करते” ही मालिका स्टार प्रवाह वरील सर्वात पाहिली जाणारी मालिका म्हणून देखील ओळखली जाते. या मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे अरुंधती.

हल्ली या मालिकेमध्ये जो ट्रॅक चालू आहे, तो अत्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. या मालिकेमध्ये अरुंधतीचे लग्न होत आहे आणि हा ट्रॅक अनेकांचा आवडीचा विषय देखील झालेला आहे परंतु या लग्नदरम्यान अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना नवीन काहीतरी सस्पेन्स पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की!

“आई कुठे काय करते?” या मालिकेमध्ये सध्या अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची तयारी चालू आहे. सर्व कुटुंबीय या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या परंपरा पद्धती देखील या लग्नाच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जात आहे. एकंदरीत काय अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाचा सोहळा धूमधडाक्यामध्ये घरात सुरू आहे.

या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. अनेकांनी तर हे फोटो शेअर देखील केलेले आहेत. अनेकांना हे लग्न कधी टेलिकास्ट होत आहे, याबद्दलची उत्सुकता देखील लागलेली आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून अरुंधती हे पात्र प्रेक्षकांच्या इतक्या आवडीचे झाले आहे की अरुंधती त्यांना त्यांच्या कुटुंबातीलच एक वाटू लागली आहे म्हणूनच टेलिव्हिजन विश्वामध्ये अरुंधतीचे लग्न हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे.

सगळीकडे आनंदमय वातावरण असताना लग्नाची तयारी जय्यतमध्ये असताना अचानक सिरीयलमध्ये असे काहीतरी घडत आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत त्याचबरोबर या मालिकेचा नवीन प्रोमो देखील आता समोर आलेला आहे. या प्रोमो ने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अनेकांना हा प्रोमो पाहिल्यानंतर टेन्शन देखील आले आहे. अरुंधतीच्या जीवनामध्ये सुख आहे की नाही असा अनेक प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.

या मालिकेचा जो प्रोमो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे पंडित लग्नाच्या विधी पार पडण्यासाठी नवरी मुलीला मंडपामध्ये बोलवतात, अशावेळी सर्वजण अरुंधतीची वाट पाहतात. तितक्यात अरुंधतीची मुलगी ईशा मात्र धावत धावत मंडपात येत असते.. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचा सूर असतो. सर्वजण इशा ला इतकी धावत का आली आहेस ?,असे देखील विचारतात. तितक्यात ईशा म्हणते की आई आपल्या खोलीत नाहीये आणि घरात कुठे दिसत देखील नाही… हे ऐकताच अनेकांच्या भुवया उंचवतात आणि सगळ्यांना काळजी लागते.

अचानक अरुंधती कुठे गेली?! असा प्रश्न देखील अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.. हे ऐकताच आशुतोष अरुंधतीला शोधण्यासाठी उठतो. नेमके काय झाले असेल, या विचारानेच तो चलबिचलित होतो. अरुंधती नेमकी कुठे गेली असेल? तिच्यासोबत काही वाईट घडलं नसेल ना? तिच्या जीवाला काही त्रास तर नसेल ना..? असे विविध प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या मनामध्ये येतात, इतक्यातच भर म्हणून अनिरुद्ध म्हणतो की, मला तर वाटते की अरुंधती लग्न सोडून पळून गेली असेल…या त्यांच्या विधानाने अनेकांना पुन्हा टेन्शन येऊ लागते.

अरुंधतीची पूर्व सासू म्हणजेच आई, अरे देवा!… असे म्हणत डोक्याला हात लावते आणि काय काय पाहायला मिळणार आहे, असे देखील म्हणते एकंदरीतच काय या मालिकेमध्ये नवीन काहीतरी घडणार आहे, हे मात्र नक्की म्हणूनच मालिकेमध्ये आलेला ट्विस्ट अनेकांच्या हृदयाचा ठाव देखील घेईल, यात शंका नाही. जर पुढे काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचं असेल तर ही मालिका अवश्य पाहायलाच लागणार आहे!