सध्याच्या एकविसाव्या शतकात काळ आणि संस्कृतीत बराच बदल झाला आहे. पूर्वी आपण ज्या गोष्टीला खूप मोठी समजायचो किंवा तिला खूप मान द्यायचो तिच गोष्ट आताच्या काळात खूपच छोटी आणि हलक्यातली वाटू लागली आहे. तसेच लोकांच्या मह्त्वाकांक्षा बदलल्या असून त्यात वाढ झाली आहे.
या बदलत्या काळानुसार, चित्रपटसृष्टीतही अनेक बदल झाले आहेत. आता चित्रपटांच्या कथांमध्ये सर्व प्रकारची कथा आणि दृश्ये उघडपणे दाखविल्या जातात. पण पहिले असे नसायचे. आजच्या लेखात आपण चित्रपट जगताच्या सुरुवातीच्या काळातील ऑडिशन पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत.
1951 च्या आणि त्याच्या आसपासच्या काळात चित्रपटांसाठी ऑडिशन कशा घेतल्या जात होत्या, हे आपण फोटोंच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू! या लेखात आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवणार आहोत ती जेम्स बर्कने क्लिक केली आहेत.
हे फोटो त्या काळातील एका प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झाले होते. चित्रपट जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक अब्दुल रशीद कारदार मुलींची स्क्रीन टेस्ट घेत असल्याचे या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळत आहे.
निर्माते स्वता घ्यायचे ऑडीशन –
https://twitter.com/newslet83450621/status/1528652033208684544
आजच्या काळात ऑडिशन घेण्यासाठी एक स्वतंत्र टीम बनवली जाते, पण पूर्वीच्या काळी दिग्दर्शक आणि निर्माते स्वतःच अभिनेत्रीचे ऑडिशन घेत असत. तसेच ऑडिशन देणाऱ्या मुलीला समोर बसवून दिग्दर्शक आणि निर्माते तिला प्रश्न विचारायचे तेव्हा त्या मुलीला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागायची.
https://twitter.com/newslet83450621/status/1528652151190302720
दिग्दर्शकासमोर तयार व्हायला लागायचे – त्या काळात ऑडिशन देण्यासाठी मुली घरून तयारी करुन येत नसत तर ऑडिशन देणाऱ्या मुलींना दिग्दर्शकासमोर तयार व्हावे लागायचे. अशाप्रकारे मुलींच्या परफॉर्मन्ससोबतच त्यांचा संपूर्ण लुकही बारकाईने तपासण्यात यायचा.
आपल्या चित्रपटांमध्ये नायिका निवडण्यासाठी दिग्दर्शक अभिनयासोबतच तिच्या प्रत्येक गोष्टीची खूप बारकाईने तपासणी करत असत. तिच्या केसांपासून तिच्या ड्रेसिंगपर्यंत सर्व गोष्टींची बारकाईने चाचणी करण्यात यायची. त्यावेळी कोणत्याही अभिनेत्रीमध्ये खूप आत्मविश्वास आणि हिंमत असणे खूप आवश्यक असते.
कारण त्या काळी आत्मविश्वासही खूप मोठी गोष्ट असायची. अशा वेळी समाजाचे बंधन तोडून दिग्दर्शक-निर्मात्यांसमोर आपले म्हणणे मांडणाऱ्या मुलींची वेगळीच ख्याती असायची. आणि समजा जर तिचे सिलेक्शन झाले नाही तर तर तिला कुठेतरी समाजात नाव ठेवली जायची. त्यामुळे ऑडिशन देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये खूप आत्मविश्वास असणं गरजेचं होतं.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !