Headlines

प्रसिद्ध मराठी गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची या शुल्लक कारणामुळे आ’त्म’ह’त्या, घटनेने हळहळ !

प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरच्या चूलत भावाने आ’त्म’ह’त्या केल्याचे समोर आले आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आ’त्म’ह’त्या केलेल्या तरुणाचे नाव असून नोकरी न मिळण्याच्या तणावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आ’त्म’ह’त्या केल्याने पुणे हादरून गेले आहे.

तसेच या घटनेपूर्वी त्याने एक चिट्ठी लिहली आहे ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने ही टोकाची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचे वय केवळ २१ होते. या घटनेमुळे माटेगावकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप देखिल केली होती. परंतु, त्याला नोकरीसाठी यश येत नव्हते. याच गोष्टीच्या तणावामुळे त्याने हे कृत्य करत असल्याचे चिट्ठीत नमूद केले आहे.


अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, तर वडील अमोल माटेगावकर हे एका नामांकित कंपनीत काम करतात. यादरम्यान, हिंजवडी पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तपास करत आहेत.

अक्षय यास भावपूर्ण श्रद्धांजली. मुलांनी आपल्या आई वडिलांचा विचार करावा आणि असे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी सर्व समाजाने आणि पालकांनी दक्षाता घ्यायला हवी. देव त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो !