सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असते. त्यात काही मजेशीर फोटो असतात तर काही अर्थपूर्ण फोटो असतात. त्यातील काही फोटो तर मेंदूला चालना देणारे असे असतात. त्यामध्ये कोडी असतात. काहीरी दडलेले असते.
काहीवेळा अंकगणित सोडवायला दिले जाते. तर काही वेळा शब्दकोडे. पण यासर्व गोष्टींमधून यूजर्सचे चांगले मनोरंजन होते. तसेच त्यांच्या मेंदूला चालना मिळते. त्यामुळे आपण खरोखर हुशार आहोत की नाही ते कळते.
सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे थोडे वेगळे आहे. या फोटोमुळे तुमच्या डोक्यावर ताण येऊ शकतो. काही वेळेस असेही होऊ शकते की प्रयत्न करूनही तुम्ही त्याचे योग्य उत्तर देऊ शकत नाही.
या व्हायरल झालेल्या फोटोत प्रथमदर्शनी तुम्हाला खूप घोडे आहेत असे वाटेल. तुमचे काहीच चूक नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की त्यात बरेच घोडे आहेत, परंतु सत्य थोडे वेगळे आहे. आम्ही तुम्हाला याचे उत्तर देऊच पण तुम्ही पण उत्तर शोधायचा प्रयत्न करा.
हा लोकप्रिय फोटो नीट पाहिल्यास त्यात एकही घोडा नसल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यात घोडा नसून अनेक झेब्रा आहेत, खरं तर नीट पाहिलं तर जे पटकन डोळ्यांना दिसतात ते फक्त झेब्राची सावली आहेत. हा फोटो नीट काळजीपूर्वक पहा आणि तुम्हाला दिसेल की काही झेब्रा सावलीच्या दिशेने चालत आहेत. आहे की नाही डोळ्यांचा धोका.
हा फोटो प्रसिद्ध वाइल्ड लाइफ फोटोग्राफर बेवर्ली जौबर्ट यांनी काढला आहे. त्यांनी 2018 मध्ये त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता पण लोकांनी त्यातला वेगळेपणा ओळखला आणि आजा त्याच वेगळेपणामुळे हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !