Headlines

बोल्ड, हॉट सुष्मिता सेन आणि म्हातारे ललित मोदी यांच्या प्रेमावर सुश्मिताच्या वैतागलेल्या जुन्या बॉयफ्रेंडने दिली धक्कादायक प्रतिक्रिया !

आयपीएलचे माजी चेअरमन आणि बिझनेसमन ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे खाजगी फोटो शेअर करून त्यांचे प्रेम उघडपणे व्यक्त करत सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सुष्मिता पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे.

कालपासून तर ती सोशल मीडियावर ट्रेंडींग विषय बनली आहे. अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला होता. त्यामुळे सुष्मिताचे मन भारतातून फरार झालेल्या ललित मोदीवर एवढ्या लवकर कसे काय जडले हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

मोदींनी त्यांच्या आयुष्यातील या टप्प्याला ‘नवीन सुरुवात’ म्हणून वर्णन केल्यावर मनोरंजन आणि क्रिकेट जगताला धक्का बसला. आता यावर सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याचे वक्तव्य समोर आले आहे.

सुष्मिता सेन काही महिन्यांपूर्वीपर्यंत रोहमन शॉलला डेट करत होती. दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करायचे. पण काही कारणासत्व त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. आता सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर रोहमन शॉलने प्रतिक्रिया दिली आहे.


पिंकव्हिलाशी एका खास मुलाखतीत त्याने सांगितले, “चला तिच्यासाठी खुश होऊया, प्रेम सुंदर आहे. मला एवढेच माहीत आहे की जर तिने एखाद्याला निवडले असेल तर तो व्यक्ती त्यासाठी पात्र आहे!”

सुष्मिता सेनने तिच्या भावाला केले अनफॉलो – सुष्मिता सेनने तिचा भाऊ राजीव सेनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे म्हटले जाते. तिला अनेकदा राजीवसोबत क्वालिटी टाइम घालवताना पाहिले आहे, परंतु माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या अशा वर्तवणूकीमुळे चाहते पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले आहे.

पण ती राजीवची पत्नी चारू असोपाला फॉलो करत आहे. त्याचबरोबर राजीवने बहीण सुष्मिता आणि चारू या दोघींनाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण विशेष म्हणजे तो ललित मोदींना फॉलो करत आहे.

सुष्मिता बद्दल बोलायचे झाल्यास तिने अजुन ललित मोदीं सोबतच्या नात्याचा कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. पण व्हायरल फोटोंमध्ये सर्व काही समजत आहे. सुष्मिता इन्स्टाग्रामवर तिचा भाऊ राजीव सेन सोडून , चारू असोपा, मुलगी रेनी सेन आणि “पार्टनर” ललित मोदी यांच्यासह आणखी काही जणांना फॉलो करते.

ललित मोदींबद्दल बोलायचे तर ऑक्टोबर 1991 मध्ये त्यांनी मीनल मोदीशी लग्न केले. ललित आणि मीनल यांना आलिया मोदी आणि एक मुलगा रुचिर मोदी ही दोन मुले आहेत. चौघेही मुंबईत त्यांच्या आलिशान घरात राहत होते. मात्र,ललित मोदींची पत्नी मीनल यांनी कॅन्सरशी लढा दिल्यानंतर 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !