Headlines

एकीला नवरा लग्न झालेला असला तरी चालतोय तर दुसरी म्हणतेय मला… जाणून घ्या बॉलिवूडच्या हसिनांच्या लग्नासाठी अजब मागण्या !

कॉफी विथ करणचा ७ वा सीजन जोरदार सुरु आहे. या शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रेटीकडुन करण जोहर अशा काही पोल खोल करुन घेतो की त्यानंतरचे काही दिवस त्या सेलिब्रेटींची विधाने चर्चेचा विषय असतात. अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर नुकतेच करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या.

तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक तसेच प्रोफेशनल लाइफसंबंधी अनेक खुलासे केले. या शो मध्ये जान्हवीने तिला कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये राहायचे नसल्याचे सांगितले तर साराने तिच्या भविष्य़ातील काही योजनांबद्दल सांगितले.

या शो मध्ये करणने साराचे कार्तिक आर्यंनसोबत असलेल्या अफेअर, डेटिंग या सर्व गोष्टींचा खुलासा केला. यावेळी साराने तिला रणवीर सिंहसोबत लग्न कऱण्याची इच्छा आहे असे बोलून दाखवले.

जेव्हा करणने साराला कसा नवरा हवा असा प्रश्न विचारला त्यावर तिने मला श्रीमंत नवरा हवा असे उत्तर दिले. त्याच्यामध्ये समजूतदारपणा तसेच भावनिकपणा असे गुण असावेत असे ती म्हणाली. साराला कोणाला डेट करायला आवडेल या करणच्या प्रश्नावर साराने साऊथचे सुपरस्टार विजय देवरकोंडाचे नाव घेतले.

विजय देवरकोंडा हा तिचा लेटेस्ट क्रश असल्ययाचे सारा म्हणाली. करण जोहरने जान्हवी कपूरला सांगितले होते की, पुढच्या वेळी तू भेटशील तेव्हा मला नवीन रिलेशनशिपमध्ये येऊन भेटायचे आहे.

यावर जान्हवीने तिला कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये राहायचे नाही, ‘मी सध्या माझ्या ग्रोथबद्दल आणि करिअरबद्दल खूप फोकस असल्याचे म्हणाली.’ जान्हवीच्या या उत्तरावर करणने ‘तुला दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळायला आवडणार नाही का?’ असे विचारले त्यावर अभिनेत्रीने तसे करण्यास नकार दिला.

सारा अली खान आणि जान्हवी कपूर नुकत्याच करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !