Headlines

ब्रालेस डीप नेक ड्रेसमुळे गर्दीमध्ये अडकलेल्या वाणी कपूरवरती आली अशी वाईट वेळ, पहा व्हिडीओ !

अभिनेता रणबीर कपूर लवकरच शमशेरा आणि ब्रम्हस्त्र या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तब्बल ४ वर्षांनी तो मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असल्यामुळे त्याचे चाहते खुप खुश आहेत. शमशेरा हा चित्रपट आधी प्रदर्शित होणार असल्यामुळे रणबीर सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय दत्तही दिसणार आहेत या चित्रपटात रणबीर पहिल्यांदाच एका डाकूची भूमिका साकारत आहे. ‘शमशेरा’ची रिलीज डेट जशी जवळ येत आहे, तशी चित्रपटाच्या टीमने त्याचे प्रमोशन सुरू केले आहे.

कलाकार म्हटल्यावर त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा आलाच. आता अलीकडेच, शमशेराचे प्रमुख कलाकार रणबीर आणि वाणी कपूर लोकांच्या गर्दीत अडकले होते, तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत रणबीर कपूर आणि वाणी कपूर गर्दीमध्ये दिसत आहेत. गर्दीमुळे वाणी एका कोपऱ्यात उभी असते, तेव्हा रणबीर तिथे येतो आणि तिला बाहेर घेऊन जातो. सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्याच्या स्वभावाचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


रणबीरची सहकलाकाराप्रतीची काळजी चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वाणीने एक सुंदर ट्यूब ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. वाणीचा हा हॉट अवतार सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे.

रणबीर 2018 मध्ये ‘संजू’ चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता चार वर्षांनंतर त्याचा ‘शमशेरा’ हा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच यावर्षी रणबीर अयान मुखर्जीच्या ‘बाह्मास्त्र’ चित्रपटात पत्नी आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

आलिया आणि रणबीरशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !