Headlines

अमीर खानचा भाऊ फैझल खानचा धक्कादायक खुलासा, सुशांत सिंगचा मृत्यू म्हणजे एक खू’न, कुटुंबीयाबद्दलही केला खुलासा !

आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या खूप चर्चेत आहे. फैजल खानने सांगितले की त्याला बिग बॉस 16 साठी ऑफर करण्यात आली होती पण त्याने ती नाकारली. या व्यतिरिक्तही तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच फैजलने टाइम्स नाऊ नवभारतला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने डिजिटल टॉकमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी फैजलने आपले घरगुती वाद, बॉलिवूडवरील ब’हि’ष्का’र, बॉक्स ऑफिस आणि सुशांत सिंह राजपूत डे’थ केस या गोष्टींवर आपले मुद्दे मांडले.

सुशांत सिंह राजपूतच्या डेथबद्दल फैजल म्हणाला की, माझ्या मते म’र्ड’र आहे. मुलाखतीत फैजलने सांगितले की, मला माहित आहे त्याची म’र्ड’र’च झाली आहे. आता याचे र’ह’स्य कधी केव्हा कसे उघडेल हे येणारी वेळच सांगेल. या मागचे र’ह’स्य शोधण्यासाठी अनेक एजन्सी कार्यरत आहेत. तपास सुरु आहे. पण काही वेळेस सत्य बाहेर येत नाही. पण हे सत्य बाहेर यावे यासाठी मी प्रार्थना करतो.

फैजल खानला मेला या चित्रपटामुळे इंडस्ट्रीत ओळख मिळाली. पण त्यानंतर तो पुन्हा आपल्या घरगुती वादांमध्ये अडकला आणि त्यामुळे इंडस्ट्रीपासून दुरावला. फैजलने सांगितले की, दुनियेशी कोणीही लढू शकतं पण आपल्याच माणसांशी लढणे खूप कठिण असते.

माझ्या कुटुंबाने काही पुरावे देऊन मला वेड लागले आहे असे दाखवले होते. आमिर साहेबांनी तर गार्ड ठेवले होते. माझा फोन काढून घेतला होता. मला कैद करुन माझा दुनियेशी संबंध तोडून टाकला होता. मला कसली तरी औषधे द्यायचे , मी हे सर्व खूप सहन केले आहे.

आधी मला वाटले पुढे जाऊन सर्व काही ठिक होईल पण नाही. तसे काहीच झाले नाही. त्यामुळे मी माझे कुटुंब सोडले. कोर्टात केस केली. त्यात मी जिंकलो आणि वेडा नाही हे कोर्टानेच सांगितले. दुसऱ्या लग्नानंतर आमचे वडिल वेगळे राहायचे पण त्यांनी हे सर्व पाहून मला पाठिंबा दिला. माझ्या हक्कासाठी मी कोर्टात केस केली आणि पुढे मी स्क्रिप्ट रायटिंग करु लागलो.

फैजल खानने सांगितले की त्यावेळी सुद्धा त्याला बिग बॉसची ऑफ आली होती. तेव्हा पैशांसाठी तो शो करावा अशी इच्छा झाली होती. पण नंतर त्यांना कोणीतरी फोन केला आणि मग मला त्या शो साठी नाकारले. आता पुन्हा एकदा फैजलला बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. पण यावेळी त्याला स्वताला भांडण तंटे यापासून दूर राहायचे आहे. त्यामुळे यावेळी त्याने स्वता ही ऑफर नाकारली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !