Headlines

अवॉर्ड शो मध्ये मनीष पॉलने अभिनेत्री मलायका अरोराची काढली इज्जत, मलाईका कशी चालते दाखवले !

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या फिटनेससोबतच हॉटनेससाठीही चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. पण ती 48 वर्षांची आहे. असे असले तरी ती तिशीतली सुंदर तरुणीच भासते. पण त्यासाठी ती जिममध्ये खूप कष्ट घेते. तासन् तास घाम गाळून ती आपली फिगर बनवते.

मलायका अरोरा अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिममध्ये जाताना ती अनेकदा पापाराझींना बिनधास्त पोज देते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.त्यावर तिचे चाहतेही भरभरुन कमेंट आणि लाइक करतात. पण अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे किंवा काही मादक पोजमुळे ट्रोलदेखील केले जाते.

मलायकाचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात ती विचित्र चालताना दिसते. तिच्या त्या चालीमुळे तिला ट्रोल केले जाते. पण तिच्या चालीमुळे एका अवॉर्ड शोमध्ये सुद्धा तिची नाचक्की झाली. मनीष पॉलने तिच्या चालीवरुन तिची खिल्ली उडवली.

बॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो फिल्मफेअर पार पडला. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाले होते. मलायका अरोरा देखील या अवॉर्ड शोचा भाग बनली होती. फिल्मफेअरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मनीष मलायकाची खिल्ली उडवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)


व्हिडिओमध्ये मनीष पॉल मलायकाच्या मूव्ह कॉपी करताना दिसत आहे. ते पाहून मलायका त्याला पुन्हा एकदा दाखव असे म्हणते. आणि पुन्हा मनीषने तेच केले. ज्यावर सगळे हसतात. त्याचवेळी मलायकालाही हसू आवरता आले नाही.

व्हिडिओच्या सुरुवातीला मनीष मलायकाला तू कशी आहेस असे विचारतो, त्यानंतर तिला तू कधी गोल्फ खेळली आहेस का असे विचारतो. यावर ती नाही असे उत्तर देते. त्यावर मनीष मजेत म्हणतो की किती अभागी आहे हा गोल्फ ज्यासोबत तू खेळली नाहीस. मैदान सुद्धा तुझी वाट पाहत आहे की कधी तू त्याच्यावर चालशील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)


त्यानंतर मनीष मलायकासारखे चालून दाखवतो. तेव्हा तो पुन्हा करुन दाखवतो. मनीषचा तो अभिनय पाहून मलायकासोबत इतर उपस्थित कलाकारसुद्धा पोटधरुन हसू लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !