Headlines

पांढरी साडी नेसून अभिनेत्री जान्हवी कपूरने अश्या पोज दिल्या कि फोटो पाहून पाणी पाणी होईल !

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडवर राज्य करत आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून ती इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सहभागी झाली आहे. जान्हवीने इंडस्ट्रीत खूप कमी वेळात आपले स्थान पक्के केले. जान्हवीने 2018 मध्ये धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट मराठीतील सैराट या चित्रपटाचा रिमेक होता.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार वर्षे झाली. या चार वर्षांत जान्हवीने बराच चाहतावर्ग जमा केला आहे. इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 21 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. जान्हवीसुद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आता नुकतेच जान्हवीने काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअक केले आहेत. त्यात अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

व्हायरल झालेल्या फोटोत जान्हवी पांढरी साडी नेसून पाण्यात पोज देत आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहेच पण त्यात तिला एका खास व्यक्तीनेही हार्ट इमोजी पाठवून कमेंट केली आहे. तो खास व्यक्ती म्हणजे अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आहे.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी आपल्या बहिणीसोबत अनंत अंबानीच्या साखरपुड्याला पोहचली होती. त्यावेळी तिने हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. त्यात ती फारच सुंदर दिसत होती. या लेहंग्यावर तिने साजेसा असा न्यूड मेकअफ केला होता. तिचा लूक चाहत्यांना खूप आला.

फोटोत जान्हवीने गाडीत बसून पोज दिली आहे. तसेच आपली परफेक्ट फिगरही दाखवली आहे. तसेच तिने आपल्या हिरव्या रंगाच्या लेहंग्यावर गुलाबी आणि हिरव्या रंगाचे मोठे झुमके घातले होते.

तसेच आणखी एका फोटोत तिने सोनेरी रंगाचा लेहंगा घातला आहे. व त्यावर बिंदी आणि मोठे झुमके असे दागिने घातले आहेत. अभिनेत्री बरेचदा सोशल मीडियावर लेहंग्यामधले फोटो पोस्ट करत असते. जे वाऱ्यासारखे व्हायरल होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !