या कारणामुळे अक्षय कुमार सोबत चित्रपट करायला घाबरते करीना कपूर, पत्नी ट्विंकल खन्ना समोरच केला खुलासा !

bollyreport
3 Min Read

अभिनेत्री करिना कपुर खान आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे दोघे २०१९ मध्ये आलेल्या गुड न्युज चित्रपटात सर्वात शेवटी एकत्र दिसले होते. करिनाचे आणि अक्षयचे एकत्र असे अनेक चित्रपट असले तरी सुरुवातीला ती त्याच्यासोबत काम करायला घाबरायची. या मागील कारण नुकतेच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपुर्वीच करिनाने ट्वीक इंडिया प्लेटफॉर्मवर ट्विंकल खन्ना सोबत मुलाखत घेतली. तेव्हा तिने ते दिवस आठवले जेव्हा ती लहान असताना अक्षयच्या सेटवर जावुन कोणाच्या तरी मांडीवर बसायची आणि शुटींगची मजा घ्यायची.
या गोष्टींत आहेत भिन्न विचार बेबोने सांगितले कि तिने आतापर्यंत लोलो म्हणजेच करिष्माच्या सर्वच को-स्टार सोबत स्क्रिनवर रोमान्स केल्याचे मला अजीब वाटते.

ती अक्षयचा पहिला शॉट पाहण्यासाठी शाळेचा गणवेश घालुन शुटींगच्या सेटवर पोहचल्याचे सुद्धा तिने सांगितले. या सर्व गोष्टीला बराच काळ लोटला आहे. जे दिसते ते सर्वच सारखे नसते. शिवाय अद्भुत देखील असते. त्यावेळी ट्विकंल म्हणाली की आपल्याकडे पुरुषांचेच करियर फार लांब काळ टिकते पण महिलांचे मात्र…. ट्विंकलचे हे विचार एकुन करिनाने तिला रोखले आणि म्हणाली कि पण आता आम्ही या सर्व गोष्टी चुकीच्या ठरवत आहोत.

७५ व्या वर्षी देखील करीना अक्षय सोबत काम करु इच्छिते – बोलण्याच्या ओघात करिनाने सांगितले कि, ती ७५ व्या वर्षी देखील अक्षयची को-स्टार बनु इच्छिते. पुढे करिनाने मजेत म्हटले कि अक्षय आतापासुनच तैमुरसोबत दोन हिरो असलेल्या चित्रपटात काम करण्याची प्लॅनिंग करत असल्याचे त्याने आधीच मला सांगितले.

करिश्मा आणि करिनासोबत अक्षयने केले काम – अक्षयने करिश्मा सोबत १९९२ मध्ये दिदार या चित्रपटामध्ये सर्वप्रथम काम केले होते. त्यानंतर सुहाग (१९९४) लहू के दो रंग (१९९७ ), जांवर (१९९९) आणि हां मैंने भी प्यार किया (२००२) यांसारख्या चित्रपट एकत्र काम केले. तर करिनाने अक्षयसोबत २००१ मध्ये अजनबी, त्यानंतर तलाश: द हंट बिगिन्स…, दोस्ती: फ्रेंड्स फॉरएवर, टशन , कम्बख्त इश्क आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटात काम केले.

करीना लहान असताना अक्षय तिच्या सोबत करायचा मस्ती – हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप सोबत मुलाखतीत अक्षयने सांगितले कि लहानपणी करीना त्याच्या सेटवर यायची तेव्हा तो करिश्मासोबत काम करत होता. तेव्हा करिना इतकी छोटी होती कि तेव्हा मी तिला उचलुन तिच्या सोबत खेळायचो आणि आता तीच माझी हिरोईन आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.