Headlines

वेळ कधी येईल सांगता येत नाही अचानक कार पाण्यात पडली तर काय करायचं, जाणून घ्या !

आपण काही वेळेस पाहिलं असेल की भीषण कार अपघात झाल्यास आणि जवळ पाण्याचा प्रवाह असल्यास ती कार पाण्यात जाऊन पडते. कार चालवत असताना ती लॉक असल्याने आणि अपघाताच्या जबर धक्क्याने कारमधील व्यक्तींना बाहेर येणे शक्य होत नाही आणि पाण्यात ते डुबले जातात. यातून आपला जीव वाचवायचा असल्यास सुरक्षित या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडायचे असल्यास आपण काय करावे हे आज पाहणार आहोत.

आपल्यासमोर अनेकदा असा कठीण प्रसंग उभा राहतो की त्यातून सावरण्यासाठी आपल्याकडे अवघ्या सेकंदाचा अवधी असतो आणि यातच प्रसंगावधानता दाखवता आपण सुरक्षीत बाहेर पडू शकतो. आपला अपघात झालेला असताना जर आपण पाण्याच्या प्रवाहात पडणार असल्याचे जाणवल्यास आपण प्रथमतः आपला सीटबेल्ट काढून लगेचच कारच्या काचा खाली कराव्यात. त्यानंतर कार पाण्यात पूर्णपणे डुबण्यापूर्वी खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वरील क्रिया करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही मिनिटाचा अवधी असतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारचा दरवाजा उघडण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा वरील क्रिया करणे सोयीचे ठरते, कारण पाण्याचा प्रवाह त्या कारच्या दरवाज्यावर दाब देत असतो. पाण्याच्या प्रवाहात कार डुबत असताना आपल्याला जर कारची काच खाली करण्यास शक्य होत नसेल तर काच तोडून टाकावी. कारच्या मागील बाजूची काच तोडण्याचा प्रयत्न करू नये, ती काच इतर काचेच्या तुलनेत अधिक मजबूत असते.

आपातकालीन परिस्थितीसाठी काच तोडण्यासाठी साहित्य देखील असते, त्यापैकी एखादे साहित्य विकत घेऊन ते कारमध्ये ठेवावे. याशिवाय कोणतीही जाड वस्तू किंवा, टोकदार वस्तूचा वापर आपण कारची काच तोडण्यासाठी करू शकतो. वरील काही वस्तू कारमध्ये नसल्यास आपण आपल्या हातच्या कोपराने काच तोडू शकता.

कारमध्ये जर लहान मुले सोबत असल्यास त्यांना आपल्यापुढे कारच्या बाहेर काढण्याचे सुनिश्चित करावे. जर तुमच्या कारची खिडकी उघडली असेल आणि सीटबेल्ट काढला असेल तरच आपण मुलांना मदत करू शकता. एकापेक्षा अधिक मुले कारमध्ये असल्यास लहान मुलापासून मग मोठे मूळ आणि नंतर तुम्ही स्वतः कारमधून बाहेर पडावे.

अनेक प्रयत्न करून देखील जर आपण कारच्या बाहेर पडू शकत नसाल तर कार पूर्णपणे पाण्यात डुबल्यानंतर कारचा दरवाजा उघडावा, सर्वात धोकादायक आणि अवघड बाब असली तरी चालून जाते. थोडावेळ थांबून मग दरवाजा उघडावा, कारण पाण्याचा प्रवाह आतील व बाहेरील दोन्ही बाजूस सारखा दाब निर्माण होतो. कारच्या आतमध्ये पाणी भरत असताना कारच्या दरवाजा उघडताना घट्ट धरून ठेवावा.

हा दाब निर्माण झाल्यानंतर एक मोठा श्वास घेत दरवाजा उघडवावा आणि पोहत बाहेर यावे. हा दरवाजा सहज उघणार नाही त्यामुळे आपल्याला बलाचा वापर करणे गरजेचे असेल. पोहत बाहेर असताना पाण्यामधील बुडबुड्यांची मदत घेत आपला मार्ग निवडावा. पाण्याखाली सहज आपण भरकटले जाऊ शकतो; याचे कारण म्हणजे पाण्यात डुबणाऱ्या कारच्या आजूबाजूचे पाणी गढूळ आणि ढगाळ होते. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहात बाहेर येण्यासाठी पाण्याचे बुडबुडे ज्या दिशेने वर जात आहेत, त्या दिशेने आपण पोहत वर यावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !