Headlines

नवीन वर्षात टॅक्स वाचवणाऱ्या ५ सर्वात जबरदस्त स्कीम्स, जमा केलेल्या पैश्यावर २७% पर्यंत रिटर्न !

दिवसभर मेहनत करुन आपण पैसे कमावतो. ते पैसे आपल्याला साठवायला येणे सुद्धा गरजेचे आहे. नाहीतर आपल्या कमावण्याला काहीच फायदा नसतो. पण सध्याच्या घडीला बचत होणे थोडे मुश्किलच असते. पण तरीही आज आम्ही तुम्हाला बचत कशी करावी याचे काही उपाय सांगणार आहोत.

बचत बँक आणि फिक्स्ड डिपॉजिट (एफडी) यांशिवाय अशा अनेक स्कीम आहेत जिथे सुरक्षितते सोबत भरघोस कमाईसुद्धा करु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ स्किम सांगणार आहोत. सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी सरकार अनेक टॅक्स सेव्हिंग स्कीम चालवते ज्यात आपण पैसे जमा करुन टॅक्स वाचवू शकतो. या स्कीममध्ये तुम्हाला चांगला रिटर्न सुद्धा मिळतो. या स्कीममध्ये ईएलएसएस, एनपीएस आणि एनएससी यांचा समावेश आहे. टॅक्स सेविंग स्कीममध्ये तुम्हाला काय फायदा होतो आणि त्यात तुम्ही किती खर्च वाचवु शकता, जमा पैशांवर किती रिटर्न मिळेल, सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करतो.

१ -ELSS म्युचुअल फंड – ईएलएसएस म्युचुअल फंड म्हणजेच इक्विटी लिंक्ड म्यूचुअल फंड होय. पैसे इक्विटी फंडात गुंतवणूक केले जातात. इनकम टॅक्सचे कलम 80Cअंतर्गत गुंतवणूकदारांना या म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक टॅक्सवर सवलत मिळते. गुंतवणुकदार १.५ लाख रुपये जमवलेल्या पैशांवर टॅक्स मुक्तीची सुविधा मिळते. ईएलएसएस मध्ये गुंतवणूक तसेच टॅक्स बचत असा दुहेरी फायदा होतो. मार्केटमध्ये ईएलएसएस चे क्वांट टैक्स प्लान, बीओआई एक्सा टॅक्स एडवांटेज, केनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेवर, मिरे एसेट टॅक्स सेवर आणि आयडीएफसी टॅक्स एडवांटेज हे टॉप 5 नावे आहेत. तीन वर्षांत क्वांट प्लॅन ३७ टक्के तर आईडीएफसी टॅक्स एडवांटेज प्लॅन२४ टक्क्यांहु अधिक रिटर्न देतो.

२. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC – एनएससी फिक्स इनकम टॅक्‍स सेविंग गुंतवणूक प्लॅन तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. ही एक सरकारी स्कीम असल्यामुळे सुरक्षित आहे. एनएससी मध्ये सेक्शन 80C च्या अंतर्गत १.५० लाख रुपयांच्या जमा पैशांवर टॅक्स वाचवू शकतात. एनएससी मध्ये वार्षिक ६.८ टक्के व्याज मिळते. गुंतवणुकदारास रेगुलर इनकमची हमी मिळते. या स्कीममध्ये ५ आणि १० वर्षे अशा दोन प्रकारची सर्टिफिकेट दिले जातात.

३. राष्ट्रीय पेंशन स्कीम -NPS – नेशनल पेंशन स्कीम ही एक पेन्शन आणि गुंतवणूक प्लॅन आहे. जेष्ठ नागरिकांसाठी भारत सरकार ही स्किम चालवते. एनपीएस च्या अंतर्गत सरकारी आणि प्राइवेट दोन्ही कर्मचारी यात सहभाग घेऊ शकतात. १८ ते १६ वयोगटातील कोणतेही नागरीक या स्किममध्ये सहभाग घेऊ शकतात. स्कीममधील गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे वेगवेगळ्या इक्विटी स्कीममध्ये जमा केले जातात. 80Cअंतर्गत तुम्ही १.५ लाख रुपये टॅक्स वाचवू शकतात. सोबत 80CCD (1B)मध्ये ५० हजार रुपये टॅक्स वाचवू शकता. म्हणजेच २ लाख रुपये टॅक्स बचतीचा फायदा तुम्हाला होतो.

4-यूनिट लिंक्ड इंश्योरेंस प्लॅन – यूलिप इंश्योरंस कंपन्या विकतात. यूलिप ही कोणतीही इंश्योरेंस पॉलिसी नाही तर ती गुंतवणूकदारांना इंश्योरेंससह गुंतवणूकीचा लाभ देते, हे एका प्लॅनसमान असते. पॉलिसीहोल्डरद्वारे जमा केलेल्या पैशांचा एक हिस्सा इंश्योरंसवर खर्च होतो तर दुसऱ्या हिस्स्याची इक्विटी आणि डेट प्लॅनमध्ये गुंतवणूक केली जाते. यूलिपही तुम्हाला १.५ लाख रुपयांचा टॅक्स डिक्शन फायदा देते. टॉप ५ यूलिपमध्ये पीएनबी मेट लाइफ, भारती एक्सलाइफ, फ्यूचर पेंशन एडवांटेज प्लॅन आणि कोटक प्लेटिनम एज प्लॅन यांचा समावेश होतो. पीएनबी मेट लाइफ सर्वात जास्त ३ वर्षांमध्ये २७.४९ टक्के आणि कोटक प्लॅटिनम एज २१.४० टक्के रिटर्न देते.

५. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड किंवा पीपीएफ – पीएफला सर्वात जास्त सुरक्षित मानले जाते. हा असा प्लॅन आहे जो टॅक्सद्वारे पैसे कमावुन देतो. पीपीएफचा कमीत कमी अवधी हा १५ वर्षांचा असतो. हे खाते उघडते वेळी पीपीएफ मध्ये ५०० असणे गरजेचे आहे. हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही राष्ट्रीय बॅंकेत सुरू करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !