Headlines

चित्रपटाच्या प्रोमोशन वेळी तब्बूने वाढवले तापमान हॉट लुकमध्ये लोकांना केले घायाळ !

बॉलिवूडमध्ये कितीही अभिनेत्रींची ये जा होत असली तरी काही अभिनेत्रींच्या अभिनयाची छापही कायम असते. बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने आपल्या फिल्मी करीअरमध्ये एकापेक्षा एक अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपला उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे चित्रपटांमध्ये धमाल उडवली आहे.

अभिनेता अर्जून कपूरसुद्धा इंडस्ट्रीमधील चार्मिंग हिरो म्हणून ओळखला जातो. त्यानेसुद्धा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो तब्बू सोबतच्या आपल्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नसीरुद्दीन शाह, राधिका मदन आणि कुमुद मिश्रा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट येत्या 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्या व्हायरल व्हिडीओमध्ये तब्बू आणि अर्जुन त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही शो इंडियन आयडियलच्या सेटवर गेले होते. तेव्हा ते सेटच्या बाहेर असलेल्या मीडियासमोर गेले. लोकप्रिय दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मुलगा आस्मान भारद्वाज हा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तब्बूने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे, साडीवर तिने आपले केस मोकळे सोडले होते.

तर अर्जुन कपूरने राखाडी रंगाचा सूट घातलेला आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावून त्याने फोटोसाठी पोज दिल्या. तब्बू आणि अर्जुन हे दोन्ही कलाकार जबरदस्त पोज देताना दिसले, फोटोत तब्बू अर्जुनला धरून उभी होती, अर्जुन जमिनीवर बसलेला दिसला, त्यानंतर दोन्ही कलाकारांनी चित्रपटाचे दिग्दर्शक आस्मान भारद्वाज आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत अनेक फोटो क्लिक केले. अर्जूनने व्हॅनिटी व्हॅनसमोरदेखील खूप पोज दिल्या. त्याचा लूक सर्वांनाच खूप आवडला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !