Headlines

चित्रपटात येण्यापूर्वी असं होत मिथुन चक्रवर्ती याचं जीवन, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले मिथून चक्रवर्ती 16 जूनला 72 वर्षांचे झाले. मिथून यांनी त्यांच्या करीअरमध्ये डिस्को डांसर, डांस-डांस, जंग, मर्द, दा कश्मीर फाइल्स, गुंडा, दादा, शेरा, दलाल असे अनेक हिट चित्रपट दिले. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या द काश्मिरी फाइल्स या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. त्यांनी अनेक शो मध्ये डान्स परीक्षक म्हणून काम केले आहे.

मेगास्टार मिथून चक्रवर्ती यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये 350 हून अधिक चित्रपटांत काम केले. पण त्यांच्या अभिनयातील करीअरची सुरुवात मृगया या चित्रपटातून केली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रुपयांमध्ये कमाई करणारा हा भारतातील पहिला चित्रपट होता. त्यांनी एका व्यवसायातून भविष्य घडवायचे ठरवले होते. पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता. अशा वेळी त्यांच्या मनात आ’त्म’ह’त्ये’चे विचार आले होते. उद्योगक्षेत्रात स्वताची ओळख निर्माण करण्याचा मिथून यांनी खूप प्रयत्न केला.

एका मुलाखतीत मिथून यांनी सांगितले की जेव्हा ते बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास आले होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हते. मी माझ्या संघर्षांच्या दिवसाबद्दल बोलायला गेलो तर अनेकांची मने तुटतील. प्रत्येकजण आयुष्यात संघर्ष करतो पण माझे संघर्ष इतके होते की मी फुटवाथवर झोपून दिवस काढले आहेत.

त्यावेळी मुंबईत मी फाइव्ह गार्डन मध्ये झोपायचो तर कधी कोणत्या हॉटेलच्या समोर झोपायचो. तेव्हा मला माझ्या एका मित्राने माटुंगा जिमखान्यात सदस्यत्व मिळवून दिले जेणेकरुन मी तिथल्या बाथरुमचा वापर तरी करत जाईन. मी तिथे सकाळी जायचो , तिथे जाऊन माझे प्रातविधी आटपून माझ्या वाटेला निघायचो. तेव्हा मला दुपारचे जेवण भेटेल की नाही किॆवा ते कुठे मिळेल याची चिंता असायची.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलीज झालेल्या ‘बेस्टसेलर’या चित्रपटातून त्यांनी ओटीटीवर डेब्यू केले. तसेच द कश्मीर फाइल्समध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !