Headlines

५६ वर्ष वयात आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत प्रकाशराज यांनी लग्न केले, किस करताना फोटो झाले व्हायरल !

बॉलीवूड चित्रपट पासून ते साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मध्ये आपल्या अभिनयाचा बार उडवणारे अनेक अभिनेते तुम्ही पाहिले असतील. या अभिनेत्यांनी दोन्ही चित्रपट सृष्टीमध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले जेव्हा अशा प्रकारचे अभिनेत्यांचे कौतुक केले जाते, तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर आवर्जून येते ते म्हणजे अभिनेता प्रकाश राज. अभिनेता प्रकाश राज यांनी आतापर्यंत बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे तसेच चित्रपट साउथ चित्रपट सृष्टी मध्ये देखील आपले वर्चस्व गाजवलेले आहे.

प्रकाश राज यांना कोणत्याही आगळ्यावेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रकाश राज यांनी आपल्या चित्रपट करिअरमध्ये “सिंघम”, “वांटेड” यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयावर आपल्या अभिनयाची छाप पडली आहे, त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये प्रकाश राज यांचे नाव चित्रपटसृष्टीमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते. प्रकाश राज नेहमी आपल्या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे प्रसिद्धीस येत असतात आणि प्रेक्षक देखील त्यांच्या भूमिकेला भरभरून दाद देतात.

प्रकाश राजांना उत्कृष्ट अभिनय शैलीच्या जोरावर केलेल्या अभिनयाला नावाजले गेले आहे तसेच त्यांना वेगवेगळ्या अवॉर्डने देखील सन्मानित केले गेले आहे. इतकेच नाही तर प्रकाश राज यांनी आपल्या 29 वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये त्यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. हे पुरस्कार मिळणे खूप कमी लोकांच्या नशिबी असते. आज प्रकाश यांचं काम फक्त साउथ इंडियन चित्रपट सृष्टी पुरता मर्यादित नसून तर बॉलीवूड मध्ये देखील त्यांनी आपला पसारा वाढविला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अभिनय करून त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे म्हणूनच साउथ चित्रपटसृष्टी व बॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये खऱ्या अर्थाने प्रकाश राज्य करत आहे, असे म्हणायला हरकत नाही.

प्रकाश राज आपल्या प्रोफेशनल लाईफ मुळे लाईम लाईट मध्ये येत असतात पण त्याचबरोबर पर्सनल लाईफ मुळे देखील अनेकदा माध्यमांसमोर चर्चेचा विषय बनलेले असतात. प्रकाश राज आपल्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कोणत्या मुद्द्यामुळे नेहमी माध्यमांसमोर येत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्याबद्दल अनेक काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. आता देखील त्यांचे काही फोटोज वायरल झालेले आहेत, त्या फोटोमध्ये प्रकाश राज लीप लॉक करताना दिसत आहेत.

अभिनेता प्रकाश राज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांची माहिती तसेच कुटुंबाचे फोटो देखील चाहत्या वर्गासाठी शेअर करत असतात. प्रकाश राज यांच्या चित्रपट करिअर विषयी बोलायचे झाल्यास, त्यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलीवूड क्षेत्राला दिलेले आहेत. तसेच वांटेड, सिंघम, दबंग टू, मुंबई मिरर, पोलीसगिरी यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपला अभिनय देखील प्रेक्षकांना दाखवलेला आहे.

प्रकाश राजांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास एकेकाळी प्रकाश राज यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती, त्यामागील कारण देखील तसेच होते. प्रकाश राज यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या म्हणजेच 56 वर्ष वयामध्ये एका तरुणीसोबत लग्न केले होते आणि हेच प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणामुळे प्रकाश राज यांना टीकेला देखील सामोरे जावे लागले होते. प्रकाश राज यांनी वर्ष 2010 मध्ये पोनी वर्मा सोबत दुसरे लग्न केले होते.