डिसेंबर महिन्याच्या अंती प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाची हवा फेब्रुवारी महिना चालु झाला तरी उतरली नाही. अजुनही सोशल मीडियावर पुष्पा ट्रेंड वेगवेगळ्या पद्धतीनी चालुच आहे. या चित्रपटामुळे दाक्षिणात्य कलाकार अल्लु अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांना बॉलिवुडकर आणि बॉलिवुड प्रेक्षकांनी उचलुन धरले आहे. या चित्रपटाची सर्वच गाणी खुप हिट ठरली आहेत. एकंदरीतच संपुर्ण चित्रपटच हिट ठरल्यामुळे त्यातील कलाकार सुद्धा मालामाल झाले आहेत.
नुकतेच अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिचे स्वप्नातील घर खरेदी केले. काही दिवसांपुर्वी रश्मिकाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की ती सध्या तिच्या घराची पॅकिंग करण्यात खुप बिझी आहे. त्यानंतर तिने नवे घर घेतल्याच्या चर्चा तिच्या फॅन्स मध्ये रंगु लागल्या. पण खरेतर रश्मिकाने तिचे घर २०२१ मध्येच खरेदी केले होते त्यामुळे ती लवकरच या घरात शिफ्ट होऊ शकते.
पुष्पा चित्रपटात महत्वाची भुमिका साकारल्यानंतर रश्मिकाकडे चित्रपटांच्या ऑफरची रांग लागली आहे. तिने बॉलिवुडचे दोन चित्रपटसुद्धा साईन केले असुन त्याचे शुट लवकरच सुरु होईल. पुष्पा चित्रपटासाठी तिने दोन करोड रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. तर पुष्पाच्या पुढच्या पार्टसाठी रश्मिकाने ३ करोड रुपयांचा बॉंड साईन केला आहे.
रश्मिकाला नॅशलन क्रश देखील म्हटले जाते. तिच्या सौंदर्याने ती अनेकांना मोहित देखील करत असते. सध्या तिचे चाहते तिला पुष्पाच्या दुसऱ्या पार्ट मध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !