Headlines

दुःखी लोकांसोबत झोपून त्यांना धीर देते हे मुलगी, एका तासासाठी घेते तब्बल एवढे रुपये !

पैसे कमावण्यासाठी लोक कोणतीही कामे करतात. काहींची कामे जरा आगळीवेगळी असतात मात्र त्यातुन भरघोस पैसा मिळतो. आता लंडनच्या स्ट्रैटफ़ोर्डमध्ये राहणाऱ्या ३० वर्षांच्या क्रिस्टीना लिंकचेच घ्याना. क्रिस्टीना दुखी आणि डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांना मिठी मारते आणि त्यांच्यासोबत झोपते. हे काम ती पार्ट टाईम करते त्यातुन लाखो रुपयेसुद्धा कमावते.
३ तासांसाठी घेते १७ हजार रुपये.

क्रिस्टीना तिच्या या कडल थिअरीच्या ३ तासांसाठी १७० पाउंड म्हणजेच १७ हजार रुपये चार्ज करते. ती या थेअरपीमध्ये दुखी लोकांचे हात पकडणे, त्यांचे केस कुरवाळणे आणि त्यांना मिठी मारुन त्यांच्या सोबत झोपणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. क्रिस्टीना तिच्या एक तासाच्या थेअरपी साठी साडेसहा हजार रुपये फि घेते आणि जर ३ तासांची थेअरपी हवी असेल तर ती त्यावर २५ टक्के सुट देते. पण ती ३ तासांहुन अधिक थेअरपी देत नाही. या कामातुन ती महिना लाखो रुपये कमावते.

असा सुरु केला अनोखा व्यवसाय – क्रिस्टीना स्वताला कडल थेअरपिस्ट म्हणते. या मागे दुखी क्लाईंटला मिठी मारुन त्यांना इमोशनल सपोर्ट देणे तसेच मानसिक साथ देणे हा हेतु असतो. तिने या तिच्या अनोख्या प्रोफेशनची सुरुवात २०१९ मध्ये तिचा ब्रेकअप झाल्यावर केली होती. सिंगल झाल्यावर तिला एकटेपणा खाऊ लागला. त्यावेळी तिने स्नगल ट्रेनिंग कोर्स केला आणि पुढे तोच कोर्स तिचा पेशा बनला.

मधुर संगीताने सुरु होते सेशन – जीवनात प्रेम आणि आपुलकीची कमी असलेल्या लोकांना मिठी मारुन त्यांचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करत असते. मिठी मारल्यामुळे लव हार्मोन ऑक्सीटोसिन तयार होतात ते एकटेपणा आणि तणावा दूर करण्यास मदत करतात. सुरुवातीला ती डोक शांत करणारे संगीत ऐकवते. त्यानंतर ती क्लाईंट सोबत डबल बेडवर मीठी मारुन झोपते.

थेअरपी मध्ये आहेत काही मर्यादा – बेडवर क्रिस्टीना क्लाइंटचे हात पकडते , त्यांचे केस कुरवाळते., त्यांना एकदम छान फिल करुन देते. यावेळी ती दर १५ मिनीटांनी तिच्या झोपण्याची पोझिशन बदलते. त्यांच्या या सेशन मध्ये काही मर्यादा असतात. ती तिच्या क्लाइंटला इमोशनली सपोर्ट करते तसेच कोणी या गोष्टीचा गैरफायदा घेत शारीरिक सुख घेणार नाही ना याची काळजी घेते. ती तिच्या क्लाइंटला मिठी कशी मारावी आणि कसा स्पर्श करावा या बाबत आधी विचारते. तिच्या मते काहींना पहिल्याच वेळी केसांना किंवा हातांना स्पर्श केलेला आवडत नाही. त्यामुळे ते घाबरतात. त्यामुळे सेशन सुरु करण्यापुर्वी ती तिच्या क्लाईंटला त्यांच्या सीमांबद्दल विचारते.

क्रिस्टीना सध्या एका मुलासोबत रिलेशनशीप मध्ये आहे. पण तिच्या बॉयफ्रेंडला तिच्या या व्यवसायाबद्दल काहीच प्रोब्लेम नाही. तो तिच्या प्रोफेशनल मागण्या जाणतो. लोक सतत तिच्या कामाला चुकीच्यो दृष्टीकोनातुन बघतात पण ती लोकांना केवळ मानसिक दृष्य्या मदतच करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !