Headlines

राघव चड्डा सोबत लग्नाची बातमी आल्यानंतर अश्या अवस्थेत दिसली परिणीती चोप्रा, पाहून धक्का बसेल !

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रोज काही ना काही चर्चा घडत असते. सेलिब्रिटी म्हटले की आपल्या कानावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकूच येतीलच. या सर्व चर्चा माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात तसेच सेलिब्रिटी लोकांच्या जीवनामध्ये नेमक्या काय काय घटना घडत असतात, या सर्वांवर माध्यमे सेलिब्रिटीवर अगदी बारीक नजर ठेवून असतात. हल्ली राघव चड्ढा व परिणीती चोप्रा यांचे रिलेशनशिप हा देखील एक चर्चेचा विषय बनलेला आहे.

अनेक माध्यम संस्था या विषयाला धरून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हिडिओज आणि फोटो अपलोड करत असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री परिणीती चोप्राला राघव चड्ढा सोबत एअरपोर्टवर पाहिले गेले,अशा वेळी पॅपराजी वेडिंग संदर्भात असलेले काही प्रश्न देखील परिणीतीला माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले, तेव्हा प्रतिनिधी ना परिणीती ने असे काही उत्तर दिले, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आलेली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोपडा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली आहे. चर्चेत राहण्याचे प्रमुख कारण चित्रपट नसून तर तिचे व्यक्तिगत जीवन आहे. नुकताच प्रियंका चोपडाची बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोपडाचे काही फोटोज समोर आलेले आहे, ज्यात परिणीती आपल्याला आप राजकीय पक्षाचे नेते राघव चड्ढा सोबत दिसली.

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या साखरपुड्याबद्दल देखील चर्चा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रंगू लागली. त्याचबरोबर हे दोघं लवकरच लग्न करतील, अशी बातमी देखील सगळीकडे पसरली आहे. हे दोघे ऑक्टोबर मध्ये लग्न करतील अशी बातमी देखील कन्फर्म झालेली आहे म्हणूनच माध्यमांच्या प्रतिनिधींनी परिमितीला काही प्रश्न देखील विचारले परंतु त्या प्रश्नांची उत्तरे परिणीती ने अगदी वेगळ्या पद्धतीने दिलेले आहे म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तर ऐकताच सर्वजण थक्क झालेले आहेत.

जसे की आम्ही सांगितल्याप्रमाणे परिणीती एअरपोर्टवर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिसली,तेव्हा ती खूपच आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नूर पाहायला मिळत होता. माध्यमांच्या प्रतिनिधी आनंदाने सामोरे गेली परंतु माध्यमाने जेव्हा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तिने कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्याचे नाकारले. त्याचबरोबर तिच्या बोटांमध्ये अंगठी देखील दिसली.

ही अंगठी ती लपवण्याचा प्रयत्न करत होती परंतु माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिच्या हातामध्ये असलेल्या अंगठीवर लक्ष केंद्रित करून तिला काही प्रश्न देखील विचारले.. प्रश्न विचारताच परिणीती शरमेने लाल लाल झाली आणि म्हणाली की, “तुम्ही सगळेजण पागल आहात” तुम्ही काहीतरी वेगळा प्रश्न मला विचारा,..असे म्हणून परिणीतीने प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.