Headlines

करोडो रुपयाचे मालक असून देखील नाना पाटेकर अगदी जगतात सर्वसामान्यप्रमाणे, फोटो पाहून तुमचे ही मन भरून येईल !

आपल्या बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्री मध्ये असे अनेक अभिनेते, आहेत जे आज यशाच्या शिखरावर पोचलेले आहेत. त्यांचे जीवन अगदी सुख सोयीने समाधानाने पूर्ण आहे. बॉलीवूडमधील काही असे अभिनेते आहेत, ज्यांचे नाव घेताच आपल्या मनामध्ये आदरपूर्वक भावना निर्माण होते. त्यापैकी एक नाव आहे अभिनेता नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी आतापर्यंत बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आहेत. नाना पाटेकर यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारून अनेक चाहतांच्या हृदयावर राज्य केलेले आहे.

आतापर्यंत आपण नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट पाहिले असतील. या चित्रपटांमध्ये नानांनी केलेली प्रत्येक भूमिका ही आगळीवेगळी ठरलेली आहे. नाना अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय देखील बनलेले असतात. नाना समाजकार्य देखील करत असतात म्हणूनच बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून नाना पाटेकर यांच्याकडे अनेकदा पाहिले जाते. आतापर्यंत प्रत्येकाला नाना पाटेकर यांचे कार्य आवडलेले आहे.

भविष्यात देखील नाना पाटेकर असे अनेक कार्य करत आहेत, ज्यामुळे ते अनेकांच्या हृदयात आपले आगळे स्थान निर्माण करतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. इतके प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून देखील नाना पाटेकर यांचे पाय मात्र आज ही जमिनीवर आहे. त्यांच्या डोक्यावर मध्ये कोणत्याही प्रकारची हवा गेलेली नाही. आज देखील नाना पाटेकर अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आपली जीवन जगत आहे. कोणत्याही प्रकारचा खोटा बुरखा, मुखवटा त्यांनी परिधान केलेला नाही.

नुकतेच सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचे काही फोटोज वायरल झालेले आहे. हे फोटो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. तुमचे मन भावुक होईल. सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत, त्या फोटोमध्ये आपण व्यवस्थित रित्या पाहिले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बहुआयामी व्यक्तिमत्व असून देखील नाना आपल्या कुटुंबीयांसोबत अगदी साध्या पद्धतीने जीवन जगत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच आपले दिनक्रम पार पाडत आहेत. हे सर्व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे, त्यांचा चाहता वर्ग या फोटोवर लाईक आणि कमेंट देखील करत आहे. जे फोटो व्हायरल झालेले आहेत त्या फोटोमध्ये नाना पाटेकर जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाना पाटेकर आपल्या आई सोबत जमिनीवर बसून जेवण करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी देखील आपल्याला दिसत आहे. असे अनेक अभिनेते आपल्याला पाहायला मिळतात. जे खूपच साध्या पद्धतीने आपले जीवन जगत असतात. त्यांच्यापैकी एक नाना पाटेकर आहेत. नाना पाटेकर कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा गाजावाजा न करता अगदी सर्वांसारखे जीवन जगत आहे. आजही नाना पाटेकर जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसोबत व्यतीत करत असतात. नाना पाटेकर यांचे घर देखील अगदी साधे आहे. आज ही नाना पाटेकर अगदी साध्या घरामध्ये राहतात. एका फोटोमध्ये आपण नाना पाटेकर यांचे किचन पाहू शकता. नाना पाटेकर यांनी आपले किचन अगदी सुटसुटीत आणि साध्या पद्धतीने ठेवलेले आहेत. किचन लहान असले तरी दिसायला मात्र आकर्षक आहे.

आज नाना पाटेकर यांच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा प्रसिद्धी आहे. नाना पाटेकर यांना सहज एखादा बंगला विकत घेता येऊ शकतो परंतु नाना पाटेकर ज्या घरामध्ये राहत आहेत,त्या घरासोबत नानांच्या खूप सार्‍या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. एकेकाळी नाना पाटेकर यांचे आई-वडील याच घरामध्ये राहायचे म्हणूनच नाना पाटेकर आजही या घरामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत आपले जीवन जगत आहेत. नाना पाटेकर यांच्या घराला एक समृद्ध वारसा आहे. हा पिढीजात वारसा जपण्यासाठी नाना नेहमी प्रयत्नशील असतात. नाना यांची पत्नी देखील एक गुणी अभिनेत्री आहे तसेच त्यांचा मुलगा सर्जनशील दिग्दर्शक आहे.

एकंदरीत नाना आपल्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करत असतात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत आपले जीवन आनंदाने जगत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत असताना देखील नाना पाटेकर यांचे लक्ष मात्र आपल्या घरावर असते, असे अनेकदा आपल्याला पाहायला देखील मिळाले आहे. नाना वेगवेगळ्या कार्यामध्ये आवर्जून सहभाग नोंदवत असतात. नाना यांच्या घरी आलेला गणपती हा चर्चेचा विषय असतो. या गणपती सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी आवर्जून उपस्थिती दर्शवितात. या सर्वांचा मानसन्मान नाना नेहमी आनंदने करत असतात.